टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खान ही सध्या अधिक चर्चेत आहे. आजवर तिने अनेक हिंदी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सोशल मीडियावरदेखील ती अधिक सक्रिय असते. काही दिवसांपूर्वी तिला स्तनांचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. याची माहिती तिने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. त्यानंतर तिचे अनेक फोटो व व्हिडीओ समोर आले होते. रोगाचे निदान झाल्यानंतर तिने तिचे केस कापले. केस कापतानाचा व्हिडीओदेखील समोर आला होता. कर्करोगाचा किती त्रास होत आहे याबद्दलही तिने तिच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर तिच्या चाहत्यांनी ती लवकर बार व्हावी अशी प्रार्थनादेखील केली होती. (hina khan boyfriend post)
सध्या हिना तिच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट देताना दिसते. तिच्या या वेळेमध्ये तिचा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वाल खंबीरपणे साथ देताना दिसत आहे. नुकतेच रॉकीने हिनाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रॉकीने शेअर केलेल्या फोटोमध्ये हिनाचे तीन फोटो दिसून येत आहेत. यामध्ये हिनाने एप्रन घातले असून एका हातात चमचा व दुसऱ्या हातात क्रॅब क्रॅकर धरलेला दिसून येत आहे.
हा फोटो पोस्ट करत तिने लिहिले आहे की, “जेव्हा ती हसते तेव्हा सर्वत्र छान वाटते. जेव्हा ती खुश होते तेव्हा आयुष्य सार्थकी लागते. जेव्हा ती माझ्याबरोबर असते तेव्हा मी जगू लागतो. जेव्हा मी तिच्याबरोबर असतो तेव्हा त्यापेक्षा माझ्यामाझ्यासाठी काहीही महत्त्वाचे नसते”.
पुढे त्याने लिहिले की, “वीकेंड खूप स्पेशल आहे कारण तिच्या आवडीचे जेवण बनत आहे”. रॉकीच्या या पोस्टवर हिनाने खूप प्रेम दाखवले आहे. तसेच या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळाली असून त्यावर अनेकांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. रॉकी व हिनाच्या प्रेमकहाणीबद्दल सांगायचे झाले तर, ‘ये रिश्ता क्या केहलाता है’ या मालिकेच्या सेटवर दोघांची मैत्री झाली होती. कालांतराने दोघांच्याही मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तेव्हापासून दोघंही एकमेकांच्या प्रेमात आहेत.