ऐश्वर्या राय अशी अभिनेत्री आहे जिच्या एका स्माईलचे लाखो चाहते दिवाने आहेत. ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ असो किंवा इतर कोणताही कार्यक्रम एण्ट्री घेताच सगळ्यांच्या नजरा ऐश्वर्या राय बच्चनकडे वळतात. पण अलीकडेच ऐश्वर्या अशा अवतारात दिसली की, तिचे चाहते थक्क झाले. मात्र, मिस वर्ल्डचा किताब पटकावलेल्या ऐश्वर्याच्या मेकअपपासून ते तिच्या आउटफिटपर्यंत सगळ्याच गोष्टींनी फॅशनप्रेमींची निराशा केली आहे. ना ऐश्वर्याचा मेकअप योग्य होता ना तिचा पोशाख. या लूकमुळे ऐश्वर्या सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होताना दिसत आहे. (Aishwarya Rai Look)
शनिवारी अनंत-राधिकाच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये ऐश्वर्या पुन्हा एकदा आपल्या मुलीबरोबर एकटी दिसली. या लग्नातही जिथे संपूर्ण बच्चन कुटुंब एकत्र आले होते, तिथे ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या बच्चनसह एकटी येताना दिसली. रिसेप्शनमध्ये ऐश्वर्या रंगीत लाँग सूटमध्ये दिसली. या फुल लेन्थ सूटसह ऐश्वर्याने काळ्या रंगाचा दुपट्टा घेतला, जो खूपच विचित्र दिसत होता.
ऐश्वर्या तिची मुलगी आराध्यासह अनंत व राधिकाच्या लग्नाला पोहोचली. त्यावेळी आराध्या येथे ब्राइट पिंक कलरच्या सूटमध्ये दिसली. व्हायरल झालेल्या या दोघांच्या फोटोंवर काही चाहत्यांनी लिहिले, “निरुपयोगी आउटफिट”. तर एकाने लिहिले की, “तिने आपल्या स्टायलिस्टला आजच काढून टाकावे”. ऐश्वर्या पुन्हा एकदा लाल लिपस्टिकमध्ये दिसली. ती अनेकदा अशा प्रकारचा मेकअप करते. आणि तिच्या या लूकच्या हेअरस्टाइलबद्दल बोलायचं झालं तर ती तिच्या केसांना पिन अप करुन आली होती. या बोल्ड कलरच्या पोशाखाबरोबर ऐश्वर्याने भरजरी दागिनेही घातले होते.
काही काळापासून ऐश्वर्या नेहमीच बच्चन कुटुंबापेक्षा वेगळी दिसत आहे. आणि याची चर्चा सध्या सोशल मीडियावर झालेली पाहायला मिळत आहे. दरम्यान काहींनी तर ऐश्वर्या व अभिषेक यांचा घटस्फोट होणार असल्याच्या अफवा पसरवल्या आहेत. अमिताभ बच्चन, जया बच्चन यांनी त्यांची मुलगी, जावई, नात आणि मुलासह अनंत-राधिकाच्या लग्नाला हजेरी लावली होती. तर ऐश्वर्या आपल्या मुलीसह या लग्नात वेगळी पोहोचली होती. मात्र, लग्नामधील एका व्हिडीओमध्ये ऐश्वर्या अभिषेकबरोबर बसलेली दिसत होती.