सध्या अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाची धामधूम अजूनही सुरु असलेली दिसून येत आहे. १२ जुलै रोजी मुंबई येथील जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटरमध्ये त्यांचा विवाह पार पडला. जगभरातील अनेक दिग्गजांनी या सोहळ्यासाठी हजेरी लावली होती. या लग्नाला हजेरी लावण्यासाठी बॉलीवूड स्टार्स, राजकारणी, क्रीडा आणि व्यावसायिक जगतातील नामांकित व्यक्ती हजर झाले होते. या शाही विवाह सोहळ्यात अनेकांनी ठेका धरला. बॉलिवूडमधील रणवीर, अनन्या पांडे यांसह अनिल कपूर, रजनीकांत यांसारख्या अनेक कलाकारांनी डान्स केला. (deepika padukone and ranveer singh viral photo)
या लग्नासाठी एमएस धोनीदेखील संपूर्ण कुटुंबासहित उपस्थित राहिला होता. धोनीने राधिकाचा विदाईच्या वेळचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये धोनी राधिकाला मिठी मारताना दिसत आहे. त्याने हा फोटो शेअर केल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मात्र या फोटोमध्ये सगळ्यांची नजर धोनी व राधिकाकडे न जाता दीपिका व रणवीरने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. दोघांचेही हाव भाव पाहून नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एमएस धोनीने राधिका व अनंत यांचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये धोनीने राधिकाला मिठी मारली असून अनंत व साक्षी बाजूला उभे आहेत. त्याने फोटो शेअर करत लग्नाच्या खास शुभेच्छाही दिल्या आहेत. त्याने लिहिले की, “राधिका तुझ्या चेहऱ्यावरील हास्य असेच राहुदे. अनंत, प्लीज राधिकावर असेच प्रेम कर आणि तिची काळजी घे. इतरांवर जसे प्रेम, माया करतोस तशीच राधिकाचीही काळजी घे. तुमच्या वैवाहिक आयुष्यात आनंद, हास्य व रोमांच असाच राहुदे. अभिनंदन आणि आपण लवकरच भेटू! गाणं विरेन काकांसाठी आहे”.
दरम्यान धोनीने शेअर केलेल्या फोटोमध्ये रणवीर व दीपिकादेखील दिसून येत आहेत. फोटोमध्ये दीपिकाच्या हावभावांवरुन ती रागात असल्याचे दिसत आहे. अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, “माझी नजर तर दीपिका व रणवीरवर आहे”, तसेच दुसऱ्या नेटककऱ्याने लिहिले की, “अरे, दीपिका रणवीरला ओरडत का आहे?” .