वडील- आणि भाऊ यांना संगीत क्षेत्रात मानाचे स्थान असताना देखील डॉ. उत्कर्ष शिंदे याने बिग बॉस च्या माध्यमातून स्वतःची ओळख बनवली. त्याला सीजन तीनचा मास्टर माईंड म्हणून देखील प्रेक्षक ओळखतात. तसेच बिगबॉस मध्ये असताना उत्कर्ष हा मनोरंजनाचं कम्प्लिट पॅकेज म्हणून प्रेक्षकांच्या समोर आला.त्याच अभिनय कौशल्य,गाणं हे सर्व प्रेक्षकांना पहायला मिळालं. (Utkarsh Shinde)
बिगबॉस नंतर उत्कर्ष सोनी मराठीवरील ज्ञानेश्वर माउली या मालिकेत पहायला मिळाला. त्या नंतर त्याने सॉंग अल्बम ही केले. परंतु खरी उत्कर्षला खरी पसंती मिळाली ती बिगबॉस मधेच. त्याचा गेम, युक्ती, या सगळ्याने त्याला सीजन तिच्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये जागा दिली. जय दुधाने आणि उत्कर्ष यांच्या जोडीला ही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. सीजन तीन ची जय वीरू ची जोडी म्हणून त्यांचे घरा बाहेर खूप कौतुक झाले.
पहा काय घडलं नक्की ? (Utkarsh Shinde)
लवकरच उत्कर्ष, महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या, ऐतिहासिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या तयारीचे अनेक BTS समोर येत असतात.अभिनेता हार्दिक जोशी,सिद्धार्थ जाधव, जय दुधाने, विशाल निकम, प्रवीण तरडे असे अनेक कलाकार या चित्रपटात पहायला मिळणार आहेत. कोणत्याही ऐतिहासिक चित्रपटात भुमीका साकारणं ही मोठी जबाबदारी असते. अनेकदा ऐतिहासिक चित्रपट पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर काटे उभे राहतात.चित्रपटाला तो जिवंतपणा आण्यासाठी कलाकार अतोनात कष्ट करत असतात.असाच एक जखम झालेल्या हाताचा फोटो उत्कर्षने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरी वरून, शेअर केला आहे. यावरून तो घेत असलेली मेहनत लक्षात येतेय. कोणताही चित्रपट यशस्वी होण्यासाठी कलाकारांची हीच मेहनत कामी येते. (Utkarsh Shinde)
कलाकारांची ही मेहनत बघता चित्रपट कसा असेल याची उत्सुकता वाढली आहे. अनेक चांगल्या कलाकारांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहणं ही एक पर्वणीच आहे. या सिनेमासाठी हे सगळेच कलाकार त्यांच्या फिटनेस कडे विशेष लक्ष देताना दिसत आहेत. त्यांचे अनेक वर्कआऊट व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हे देखील वाचा : ‘आणि जेव्हा चाहते कलाकाराला लिफ्ट देतात’ कोल्हापूरकरांचा फॅन झाला अभिनेता उत्कर्ष शिंदे