सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अंकिता लोखंडेला पाठिंबा दर्शविण्यासाठी अमृता खानविलकरची ‘बिग बॉस’च्या घरात एंट्री, एकमेकींना पाहून दोघींनाही अश्रू अनावर, म्हणाली, “तू रडली आहेस पण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 27, 2024 | 10:42 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
ankita and amruta

अंकिता लोखंडेला पाठिंबा दर्शविण्यासाठी अमृता खानविलकरची 'बिग बॉस'च्या घरात एंट्री, एकमेकींना पाहून दोघींनाही अश्रू अनावर, म्हणाली, "तू रडली आहेस पण…"

Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’चा फिनाले अवघ्या एका दिवसाच्या अंतरावर आहे. सर्वच चाहते या फिनालेची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. सोशल मीडियावरही सर्वत्र या रिऍलिटी शोची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस १७’च्या फिनालेमध्ये अंकिता लोखंडे, मुन्नवर फारुकी, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार, अरुण माशेट्टी हे स्पर्धक पोहोचले आहेत. साऱ्या स्पर्धकांनी उत्तम खेळी खेळत या शोचा फिनाले पर्यंतचा प्रवास पार केला आहे.

प्रेक्षकांसह अनेक कलाकार मंडळीही या स्पर्धकांना पाठिंबा दर्शविताना दिसत आहेत. अशातच ‘बिग बॉस’च्या घरात कलाकारांना पाठिंबा देण्यासाठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. अशातच ‘पवित्र रिश्ता’पासून अंकिताने तिचा खूप मोठा चाहतावर्ग कमावल्याने ती बिग बॉसची ट्रॉफी घरी घेऊन जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या दरम्यान अंकिताला पाठिंबा देण्यासाठी तिची जवळची मैत्रीण व लोकप्रिय मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर पोहोचली आहे.

आणखी वाचा – श्रेया बुगडेने सुरु केलं स्वतःचं हॉटेल, मराठी कलाकारांची जमली गर्दी, भाऊ पियुष रानडेही बायकोसह पोहोचला अन्…

Promo #BiggBoss17 Trophy revealed, aur Celebrity guests ne diya #MunawarFaruqui #AbhishekKumar #AnkitaLokhande ko feedback pic.twitter.com/kAXdd4Oifk

— The Khabri (@TheKhabriTweets) January 26, 2024

‘द खबरी’ या पोर्टलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अमृताचा अंकितासाठीचा पाठिंबा पाहायला मिळत आहे. अमृताला पाहून अंकिता भावूक झालेली पाहायला मिळाली. ‘बिग बॉस’सुरु झाल्यापासून अमृता अंकिताच्या मागे उभी होती. वेळोवेळी तिची खेळी पाहता अमृता तिला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्टही शेअर करताना दिसली. अंकिताच ट्रॉफी जिंकेल असा विश्वासही अमृताला आहे. आता ती ‘बिग बॉस १७’च्या घरात लाडक्या मैत्रिणीला पाठिंबा देण्यासाठी आली आहे.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेला जिंकण्यासाठी बॉलिवूडसह मराठी कलाकारांचा पाठिंबा, सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री म्हणाली…

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अमृता अंकिताला असं बोलताना दिसत आहे की, “जेवढी अंकिता ‘बिग बॉस’च्या घरात रडली आहे तेवढी मी व माझी आई बसून रडलो आहोत” असं म्हणत अंकिता व अमृता दोघींनाही अश्रू अनावर झाले. दरम्यान याआधी अंकिताला पाठिंबा देण्यासाठी अभिनेत्री रश्मी देसाई येईल, असे बोललं जात होतं. मात्र शेवटच्या क्षणी तिचे येणे रद्द झाले असून अमृता BB17 मध्ये सहभागी झाली.

Tags: amruta khanvilkarankita lokhandebigg bossbigg boss 17entertainmentmarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Uday Tikekar shared a special photo with his wife and wished her on her birthday

उदय टीकेकर यांचा पत्नीबरोबर रोमॅंटिक फोटो, किसही केलं , म्हणाले, “बायको...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.