शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुला परफॉर्म करताना पाहिलं तेव्हा…”, ‘चंद्रा’ गाणं घडवणाऱ्या आशिष पाटीलने सुरु केला स्वतःचा डान्स स्टुडिओ, अमृता खानविलकर म्हणाली, “मेहनत…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 30, 2024 | 11:23 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Amruta Khanvilkar praised Ashish Patil for his new dance studio by sharing a special post

"तुला पफॉर्म करताना पाहिलं तेव्हा...", 'चंद्रा' गाणं घडवणाऱ्या आशिष पाटीलने सुरु केला स्वतःचा डान्स स्टुडिओ, अमृता खानविलकर म्हणाली, "मेहनत..."

प्रत्येक कलाकाराचे काहीना काही स्वप्न असतंच आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी प्रत्येक कलाकार झटत असतो. जीवापाड मेहनत घेत असतो आणि अखेर एकेदिवशी ते स्वप्न सत्यात उतरवतोच. अशीच एक स्वप्नपूर्ती झालेला कलाकार म्हणजे लावणीकिंग आशिष पाटील. अनेक हिंदी व मराठी डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये नृत्यदिग्दर्शक म्हणून झळकलेला लोकप्रिय नृत्यकलाकार म्हणून आशिष पाटील हे नाव सर्वश्रुत आहे. आज अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये लावणी म्हटलं की आशिष पाटीलच्या नृत्यदिग्दर्शनाला प्राधान्य दिलं जातं.

आशिषने नुकताच त्याचा स्वत: डान्स स्टुडिओ सुरु केला असून इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर करत त्याने ही माहिती सर्वांना दिली आहे. मुंबईतील गोरेगाव या ठिकाणी त्याने हा डान्स स्टुडिओ सुरु केला असून या स्टुडिओमध्ये सर्व प्रकरचे डान्स क्लासेस, रील्स शूटिंग, वर्कशॉप्स आणि सर्व प्रकारच्या रिहर्सल्स पार पडणार आहेत. असं त्यांनी या व्हिडीओद्वारे सांगितलं आहे. आशिषच्या या नवीन स्टुडिओनिमित्त मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी त्याचे कौतुक केले आहे. अशातच अभिनेत्री अमृता खानविलकरने आशिषचे कौतुक करत एक खास पोस्ट लिहिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

आणखी वाचा – Video : अभिमानास्पद! आशिष पाटीलने सुरु केला स्वतःचा डान्स स्टुडिओ, मराठी कलाकारांकडून तोंडभरुन कौतुक, म्हणाला, “स्वप्न होतं ते…”

अमृताने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “प्रिय आशिष, आज मला तो दिवस आठवतो जेव्हा मी तुला परफॉर्म करताना आणि तुझ्याबरोबर काम करण्यासाठी तुझ्या विश्वात पाऊल टाकले. तिथून मी तुझ्या प्रवासाची साक्षीदार आहे. मग ‘बाई गं’ व ‘चंद्रा’ या गाण्यांच्या माध्यमातून तुझ्याबरोबर आयुष्यभराची आठवण निर्माण करण्यासाठी एकत्र येणे हा एक आशीर्वादच होता. तुझी आवड व तुझी मेहनत इतकी भारावून टाकणारी आहे की, ती तुझ्या आजूबाजूच्या लोकांनाही चांगले काम करण्यास प्रवृत्त करते. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल आणि तुझे नृत्याचे कौशल्य मला शिकवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद”.

आणखी वाचा – आजचे राशी भविष्य : आज ‘या’ राशीच्या लोकांवर होणार शनिदेवाची कृपा, कुणाच्या भाग्यात नेमकं काय?, जाणून घ्या…

यापुढे अमृताने असं म्हटलं आहे की, “कलांगण ही खास जागा तुझ्या मेहनतीचे व निखळ उत्कटतेचे प्रतीक आहे आणि त्याचबरोबर ती तुझे प्रतिनिधित्वही करते. मी तुला तुझ्या आत्ताच्या सर्वोत्कृष्टतेशिवाय काहीही शुभेच्छा देऊ इच्छित नाही. ‘कलांगण’ ही नर्तक, कलाकार, अभिनेते, गायक आणि कलेच्या विविध रूपांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठीची खास जागा आहे. त्यामुळे या ठिकाणच्या वातावरणाचा अनुभव नक्की घ्या.” दरम्यान, अमृतासह प्रसाद ओक, हेमांगी कवी, समृद्धी केळकर, अवधूत गुप्ते यांश अनेक कलाकारांनी आशिषला त्याच्या नवीन डान्स स्टुडिओसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: amruta khanvilkarAshish Patilmarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Priya Bapat And Umesh Kamat On Gulabi Sadi

Video : 'गुलाबी साडी'वर प्रिया बापट-उमेश कामतचा भन्नाट डान्स, नवरा-बायकोचा पहिल्यांदाच एकत्र डान्स पाहून चाहतेही भारावले

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.