शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“रोमान्सही जमत नाही अन्…”, अमृता फडणवीसांचं पती देवेंद्र फडणवीसांबाबत वक्तव्य, म्हणाल्या, “राजकारणा शिवाय…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 7, 2024 | 2:32 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Amruta Fadnavis said that her husband and Deputy Chief Minister Devendra Fadnavis is not romantic see the details

“ते खूप व्यावहारिक आहेत आणि मी रोमॅंटिक आहे”, अमृता फडणवीसांचं पती देवेंद्र फडणवीसांबाबत वक्तव्य

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारणी असल्यामुळे कायम चर्चेत असतात. पण देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचीही कायम चर्चा होत असते. त्या सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. राजकारणातील असे फार कमी जोडपे आहेत, ज्यांची कायम चर्चा होत असते. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे नेहमीच ‘पॉवर कपल’ म्हणून पाहिले जाते. देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. अमृता फडणवीसांना कलाक्षेत्राची आवड असून त्या उत्तम गायिका आणि समाजसेविकाही आहेत. अमृता फडणवीस या त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून चर्चेत राहत असतात. (Amruta Fadnavis on Devendra Fadnavis)

आमदार म्हणून दुस-यांदा निवडून आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे लग्‍न झाले. त्यांचा विवाह हा नागपूरमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. त्यांच्या पत्नी अमृता या नागपूरचे प्रसिद्ध डॉक्टर चारू रानडे आणि नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. शरद रानडे यांच्या कन्या होत्या. देवेंद्रचे नीकटवर्तीय आणि मित्र शैलेश जोगळेकर यांच्या घरी देवेंद्र आणि अमृता यांची भेट झाली होती, दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. अशातच अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस हे रोमॅंटिक नसल्याचे म्हटलं आहे. अमृता देशमुख यांनी सन मराठीवरील ‘होऊ दे चर्चा, कार्यक्रम आहे घरचा’ या कार्यक्रमात त्यांच्याबद्दल भाष्य केलं आहे.  

View this post on Instagram

A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)

 

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : मनाचा मोठेपणा! सूरजने टीमला दिलं कॅप्टन्सी मिळाल्याचं संपूर्ण श्रेय, रितेश देशमुखही भारावला, म्हणाला, “योग्य ती भूमिका…”

यावेळी अमृता यांनी असं म्हटलं की, “धरण उशाला, कोरड घशाला असं म्हटल्याप्रमाणे देवेंद्रजी माझ्यापुढे असे झळकतात. म्हणजे ते मला फक्त घरात येताना आणि घरातून बाहेर जाताना दिसतात. फक्त येतात… आणि जातात… ते मला रोज दिसतात. पण त्यांना पकडून माझ्याबरोबर वेळ घालवायचा किंवा मस्ती करायची असं करताच येत नाही. त्यामुळे धरण उशाला, कोरड घशाला हे त्यांच्याबाबतीत आहे”. पुढे सोनाली त्यांना “देवेंद्रजी रोमॅंटिक आहेत का?” असं विचारते. यावर अमृता फडणवीस “नाही” म्हणते. मग सोनाली “आधी होते का?” असं विचारते. त्यावर अमृता “कधीच नव्हते. लग्नाआधीही नव्हते आणि आताही नाहीत. ते खूप व्यावहारिक आहेत आणि मी रोमॅंटिक आहे. ते खूप व्यावहारिक आहेत. त्यांना रोमान्स जमतही नाही कळतही नाही. त्यांना राजकारण सोडून काही कळत नाही”.

आणखी वाचा – Ganeshotsav 2024 : मराठी कलाकारांच्या घरी बाप्पाचं आगमन, ढोल-ताशांच्या गजरात नाचण्यातही झाले दंग, घरातील सजावटही आहे आकर्षक

दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी आणि चाणाक्ष राजकारणासाठी ओळखले जातात. मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्दही यशस्वी ठरली होती. सध्या ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. तर अमृता फडणवीस या कायमच देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देत असल्याचे पाहायला मिळाले आहे. अमृता या राजकारणात सक्रीय नसल्या तरी त्या राजकरणाबद्दल कायम प्रतिक्रिया व्यक्त करत असतात.

Tags: amruta fadnavisdevendra fadnavisMarathi news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Shivani Rangole Viral Video

'तुला शिकवीन…' मधील मास्तरीण बाईंची गणरायाला विनंती, म्हणाल्या, "मुलींवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.