राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारणी असल्यामुळे कायम चर्चेत असतात. पण देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचीही कायम चर्चा होत असते. त्या सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. राजकारणातील असे फार कमी जोडपे आहेत, ज्यांची कायम चर्चा होत असते. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे नेहमीच ‘पॉवर कपल’ म्हणून पाहिले जाते. देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. अमृता फडणवीसांना कलाक्षेत्राची आवड असून त्या उत्तम गायिका आणि समाजसेविकाही आहेत. अमृता फडणवीस या त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून चर्चेत राहत असतात. (Amruta Fadnavis on Devendra Fadnavis)
आमदार म्हणून दुस-यांदा निवडून आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे लग्न झाले. त्यांचा विवाह हा नागपूरमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. त्यांच्या पत्नी अमृता या नागपूरचे प्रसिद्ध डॉक्टर चारू रानडे आणि नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. शरद रानडे यांच्या कन्या होत्या. देवेंद्रचे नीकटवर्तीय आणि मित्र शैलेश जोगळेकर यांच्या घरी देवेंद्र आणि अमृता यांची भेट झाली होती, दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. अशातच अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस हे रोमॅंटिक नसल्याचे म्हटलं आहे. अमृता देशमुख यांनी सन मराठीवरील ‘होऊ दे चर्चा, कार्यक्रम आहे घरचा’ या कार्यक्रमात त्यांच्याबद्दल भाष्य केलं आहे.
यावेळी अमृता यांनी असं म्हटलं की, “धरण उशाला, कोरड घशाला असं म्हटल्याप्रमाणे देवेंद्रजी माझ्यापुढे असे झळकतात. म्हणजे ते मला फक्त घरात येताना आणि घरातून बाहेर जाताना दिसतात. फक्त येतात… आणि जातात… ते मला रोज दिसतात. पण त्यांना पकडून माझ्याबरोबर वेळ घालवायचा किंवा मस्ती करायची असं करताच येत नाही. त्यामुळे धरण उशाला, कोरड घशाला हे त्यांच्याबाबतीत आहे”. पुढे सोनाली त्यांना “देवेंद्रजी रोमॅंटिक आहेत का?” असं विचारते. यावर अमृता फडणवीस “नाही” म्हणते. मग सोनाली “आधी होते का?” असं विचारते. त्यावर अमृता “कधीच नव्हते. लग्नाआधीही नव्हते आणि आताही नाहीत. ते खूप व्यावहारिक आहेत आणि मी रोमॅंटिक आहे. ते खूप व्यावहारिक आहेत. त्यांना रोमान्स जमतही नाही कळतही नाही. त्यांना राजकारण सोडून काही कळत नाही”.
दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी आणि चाणाक्ष राजकारणासाठी ओळखले जातात. मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्दही यशस्वी ठरली होती. सध्या ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. तर अमृता फडणवीस या कायमच देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देत असल्याचे पाहायला मिळाले आहे. अमृता या राजकारणात सक्रीय नसल्या तरी त्या राजकरणाबद्दल कायम प्रतिक्रिया व्यक्त करत असतात.