‘बिग बॉस मराठी ४’ च्या घरातील साऱ्याच स्पर्धकांनी आपापली वेगळी ओळख बनवली. दरम्यान या स्पर्धकांपैकी अनपेक्षित पणे घराबाहेर जाणारी एक स्पर्धक म्हणजे पुण्याची टॉकरवडी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री अमृता देशमुख. स्वतःच्या बोलण्याने तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. (amruta deshmukh prashant damle)
घराबाहेर पडताच तिच्या साऱ्या चाहत्यांनी नाराजगी ही दर्शविली होती. ‘बिग बॉस’च्या घरात असताना अमृता आणि प्रसादच्या नात्याची चर्चा ही प्रचंड रंगली होती. यावर दोघांनीही आपल्या नात्यावर भाष्य करत आमचं नातं मैत्री पलीकडे आहे, असं मान्य केले आहे. आता अमृता एक नवी कलाकृती सादर करण्यासाठी प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे.
पहा अमृताची नवी कलाकृती – (amruta deshmukh prashant damle)
अमृताने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिलीय. लवकरच ती प्रशांत दामले यांच्या नियम व अटी लागू या नाटकातून प्रेक्षकांसमोर अभिनयाची जादू दाखवण्यास येत आहे. यावर प्रशांत दामले यांनी पोस्ट करत म्हटलंय, नियमावली वठणीवर आणणारी अट म्हणजे आमची ही अभिनेत्री अमृता देशमुख. मात्र तरीपण या घरातला बिग बॉस वेगळाच आहे. कोण आहे तो? कळेल लवकरच असे म्हणत त्यांनी त्यांची ही पोस्ट अमृताला टॅग केली आहे.(amruta deshmukh prashant damle)
====
हे ही वाचा – “ओळख आणि बक्कळ पैसे असतील तरंच आपली कामे होतात” देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत अभिनेता ओंकार कर्वेची पोस्ट चर्चेत
====
प्रशांत दामले यांच्या आगामी नियम व अटी लागू या नाटकांत संकर्षण कऱ्हाडे, अमृता देशमुख पाहायला मिळणार आहेत, यांच्या शिवाय आणखी कोणते कलाकार या नाटकांत झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. मराठी रंगभूमीवर प्रशांत दामले यांची जागा कुणीही घेऊ शकत नाही. त्यांच्या प्रत्येक नाटकाचं वेगळेपण हे नेहमीच कौतुकास्पद असत.(amruta deshmukh prashant damle)
अमृता देशमुख ‘फ्रेशर्स’, ‘देवा शपथ’, ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकांमुळे चर्चेत आली. याशिवाय अमृता स्वीटी सातारकर या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकली. आर जे म्हणून करियरची सुरुवात केलेल्या अमृताने अभिनयसृष्टीतही उत्तम काम केले. अमृताला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली ती बिग बॉसमुळे. तिच्या सोशल मिडीयावरही अमृता बऱ्यापैकी सक्रिय असते. तिच्या हटके फोटोशूटमुळेही ती चर्चेत असते.