मराठी कलाकार सोशल मीडियावर व्यक्त होत आपलं मत व्यक्त करून नेहमीच चर्चेत असतात. कोरोना महामारीनानंतर तर या कलाकार मंडळींनी आपली भूमिका मांडण्याचा सपाटा लावला होता. चांगले वाईट अनुभव शेअर करत ही कलाकार मंडळी आपलं मत स्पष्ट करत असतात, त्यांच्या या पोस्टवर चाहते देखील बरेचदा कमेंट करत व्यक्त होतात.(omkar karve post)
ही कलाकार मंडळी त्यांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल तसेच तिकीट काढून चित्रपटांचे शो रद्द झाल्याने किंवा मराठी चित्रपटांना थिएटर न मिळाल्याने परखडपणे भाष्य करतात. अशातच एका मराठी कलाकाराने फेसबुकवर पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. या पोस्टमध्ये त्या अभिनेत्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.

पहा काय म्हणाला ओंकार – (omkar karve post)
‘गाथा नवनाथांची’ या मालिकेत झळकणारा अभिनेता ओंकार कर्वेची ही पोस्ट आहे. ओंकारने त्याला आलेला अनुभव शेअर करत ही पोस्ट केली आहे. आपला एखाद महत्वाचं काम होण्यासाठी आपल्याकडे बक्कळ पैसे हवेत किंवा आपली तशी ओळख हवी आणि यापैकी काही नसेल तर आपल्याला कोणीही विचारत नाही असं सांगणारी पोस्ट त्याने केली आहे.(omkar karve post)

ओंकारने फेसबुक वर पोस्ट करत म्हंटल आहे की, ‘तुमची कामं व्हायला एकतर तुमच्याकडे भरपूर पैसे हवेत किंवा राजाश्रय हवा किंवा काम करून देणाऱ्या व्यक्तीचा त्यात फायदा हवा किंवा तुम्ही कोणाच्या मर्जीतले असायला हवे. नाहीतर कोणी विचारात नाही तुम्हाला कितीही योग्य असलात तरी…आलेल्या अनुभवांवरून. असे म्हणत ओंकारने #Devendrafadanvis असा हॅशटॅग वापरला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत ही पोस्ट केल्याने ही पोस्ट वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरली आहे.(omkar karve post)
====
हे देखील वाचा – ‘डायबिटीस चा काय अर्थ…..’ रुद्राज देतोय आरोग्याबाबत सल्ले
====
ओंकारने केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. त्यात एका युजरने ओंकारला पाठिंबा देत म्हटलंय की, खरं आहे ओंकार, आपण फक्त विचारच व्यक्त करू शकतो. तर दुसऱ्या युजरने म्हटलंय, लाखमोलाची गोष्ट, गुणवत्ता, कौशल्य, पात्रता या गौण गोष्टी आहेत” यावर ओंकारने कमेंट करत म्हटलंय, येस अँड आय आम डन विथ दिस सिस्टीम . टायर्ड नाव”
ओंकार ‘गाथा नवनाथांची’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याशिवाय त्याने अनेक मालिका, चित्रपटातही काम केले आहे. तसेच तो ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटातही झळकला होता. (omkar karve post)