एनर्जीच पूर्ण पॅकेज म्हणजे अभिनेत्री अमृता देशमुख. झी युवा वरील फ्रेशर्स या मालिकेने अमृताच्या नावाला ओळख दिली.त्या नंतर तिने देवाशपथ, आठशे खिडक्या नवशे दार अशा अनेक मालिका केल्या. छोट्या पद्यप्रमाणे स्वीटी सातारकर या चित्रपटाने तिने मोठा पडदा ही गाजवला. पुण्याची टॉकरवडी म्हणत तिच्या आवाजातील आत्मविश्वानसाने श्रोत्यांना कायम खिळवून ठेवलं.(Amruta Deshmukh Prasad Jawade)
परंतु अमृताचं नाव खऱ्या अर्थाने चर्चेत आलं ते,ती बिगबॉस मराठी सीजन ४ मध्ये सहभागी झाली तेव्हा. या शो मध्ये तिच्या हजरजबाबीपणाने प्रेक्षकांचं मन जिंकलं. ‘बिग बॉस च्या घरा बाहेर आल्यापासून अमृता अनेक प्रोजेक्ट्स करतं आहे. असच रंगभूमीवर सध्या तीच एक नवीन, नियम व अटी लागू हे नाटक सुरु आहे. या नाटकातून संकर्षण कऱ्हाडे आणि अमृता देशमुख ही नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यांच्या या नाटकाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतो आहे.
वाचा काय आहे प्रसादच कॅप्शन (Amruta Deshmukh Prasad Jawade)
बिगबॉस आणि अमृता देशमुख म्हंटल की प्रसाद जवादे हे नाव आपसूकच येत. बिग बॉस च्या घरात तर त्यांचं विशेष बॉण्डिंग पहायला मिळालंच.परंतु, घरा बाहेर आल्या नंतर ते बॉण्डिंग जास्त खुलताना दिसलं. प्रसाद आणि अमृता एकमेकांना डेट करतायत या चर्चाना सोशल मीडियावर उधाण आलं आहे, या चर्चा सुरु असतानाच अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांनी अजून एक स्टोरी नुकतीच त्यांच्या सोशल मीडियावरून शेअर केली आहे..तिच्या या नाटकाच्या एका प्रयोगाला प्रसाद च्या आई- वडिलांनी हजेरी लावली. त्यांच्या सोबतचा एक फोटो अमृताने, थँक यु काका काकू कुठलीही अट न ठेवता नियम व अटी लागू बघायला आल्या बदल, mis यु प्रसाद जवादे असं कॅप्शन देत शेअर केला आहे. तिची ही स्टोरी प्रसाद ने, ‘But looks like we have found what was missing असं कॅप्शन देत रिपोस्ट केला आहे. जवादे कुटुंबामध्ये असलेली कमी भरून निघाली असं प्रसादच म्हणणं आहे. त्यांच्या या स्टोरी मुळे ते रेलशनशिप मध्ये आहेत का अशी शंका आहे. (Amruta Deshmukh Prasad Jawade)
बिग बॉस च्या घरा बाहेर आल्या पासून प्रसाद आणि अमृता बरेचदा भेटत असतात. नियम व अटी लागू या नाटकाच्या शूमारंभाच्या प्रयोगला प्रसादने देखील हजेरी लावली होती.त्यांच्या फॅन्सने तर चक्क त्यांना त्याच्या बिग बॉस च्या घरातील फोटोजचा अल्बम देखील केला होता. तो अल्बम देखील त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून शेअर केला होता. परंतु अमृता आणि प्रसादने त्यांच्या नात्याविषयी कोणता ही स्पष्ट असा खुलासा केला नाही.
हे देखील वाचा : प्रसाद जवादे क्या केहना है ? अमृताच्या पोस्ट वर चाहत्याची कमेंट.