कलाकार मंडळी हे त्यांच्या शूटिंगनिमित्त बरेचदा घरापासून दूर असतात. कामानिमित्त त्यांना घरापासून दूर राहून शूटिंग करावं लागत. अशातच सध्या एका मालिकेचं शूटिंग हे सातारा येथे सुरु आहे. ही मालिका म्हणजे झी मराठी वाहिनीवरील पारू. या मालिकेत अभिनेता प्रसाद जवादे मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. सध्या प्रसाद त्याच्या या मालिकेच्या शुटिंगनिमित्त साताऱ्यात वास्तव्यास आहे. सुट्टीच्या दिवशी तो त्याच्या घरी परतत असल्याचं त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. (Amruta Deshmukh And Prasad Jawade)
प्रसाद जवादे हा अभिनेत्री अमृता देशमुख बरोबरच्या लग्नामुळे चर्चेत आला. ‘बिग बॉस’ मराठीमध्ये प्रसाद व अमृताची ओळख व मैत्री झाली. त्यानंतर त्यांच्यातील प्रेम खुलत गेलं. अमृता व प्रसाद रिलेशनशिपमध्ये आहेत अशा चर्चा त्यांच्या लग्नापूर्वी बरेचदा कानावर आल्या, मात्र त्यांनी या चर्चांवर काहीच भाष्य केलं नाही. थेट साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्यांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली. त्यानंतर दोघांचा अगदी शाही थाटामाटात विवाहसोहळा संपन्न झाला. दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

लग्नानंतर प्रसाद व अमृता दोघांनीही कामाला सुरुवात केली. अमृता सध्या रंगभूमीकडे वळली असून नाटकांच्या प्रयोगांमध्ये ती व्यस्त असते. तर प्रसाद झी मराठी वाहिनीवरील पारू या मालिकेत मुख्य भूमिका साकारतोय. या मालिकेचं शूटिंग साताऱ्यात सुरु असल्याने प्रसादला घरापासून, बायकोपासून दूर राहावं लागतंय. याची खंतही त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली. मात्र आता प्रसाद त्याच्या बायकोला म्हणजेचं अमृतालाही साताऱ्यात घेऊन गेला असल्याचं त्यांच्या स्टोरीवरून समोर आलं आहे.
अमृताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन दोघांचा एकत्र एक व्हिडीओ शेअर करत साताऱ्यात असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे वेळात वेळ काढून दोघंही एकमेकांसह क्वालिटी टाइम घालवताना दिसत आहेत. प्रसादने शुटींगमुळे घरापासून, बायकोपासून दूर राहत असल्याची खंत व्यक्त करत नुकत्याच इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं. तो म्हणाला, ““आम्ही सातारा येथे शूट करत आहोत. कधी कधी घराची खूप आठवण येते. माझं नुकतंच लग्न झालं आहे, त्यामुळे बायकोला सोडून राहावं लागतं तो एक मोठा टास्क आहे. अधूनमधून आम्ही एकमेकांना भेटतो. कधी ती साताऱ्यात तर कधी मी मुंबईत असं भेटणं सुरुच असतं”.