शनिवार, मे 17, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘मी उत्तम आयुष्य…”, ‘तारक मेहता…’ मधील बबिताचं साखरपुड्याच्या चर्चांवर स्पष्टीकरण, न्यूयॉर्कमध्ये फिरतानाचे फोटो शेअर केले अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 14, 2024 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
'मी उत्तम आयुष्य…", 'तारक मेहता…' मधील बबिताचं साखरपुड्याच्या चर्चांवर स्पष्टीकरण, न्यूयॉर्कमध्ये फिरतानाचे फोटो शेअर केले अन्…

'मी उत्तम आयुष्य…", 'तारक मेहता…' मधील बबिताचं साखरपुड्याच्या चर्चांवर स्पष्टीकरण, न्यूयॉर्कमध्ये फिरतानाचे फोटो शेअर केले अन्…

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील दोन कलाकार सध्या चर्चेत आले आहेत. मालिकेत बबिता आणि टप्पू या भूमिका साकारणारे कलाकार सध्या चर्चेत आले आहेत. मालिकेत टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनाडकट आणि अभिनेत्री मुनमुन दत्ता यांचं अफेअर सुरु असल्याच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु होत्या. त्यानंतर दोघांनी थेट साखरपुडा केला असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. सगळीकडे या दोघांच्या बातमीने गोंधळ उडाला. दरम्यान मुनमुन दत्ताने स्वतः पुढे येऊन या अफवांचे खंडन केले. (Munmun Datta Post)

मुनमुन सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे आणि तिथे ती तिचे उत्तम आयुष्य जगत आहे. न्यूयॉर्कमधील काही फोटोशूटचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मुनमुन दत्ताने न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन ब्रिजवर फोटोशूट केले आहे. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मी माझे सर्वोत्तम आयुष्य जगत आहे. माझ्या न्यूयॉर्क प्रवासातील हे खास फोटोशूट शेअर करत आहे”. मुनमुनने ‘इटाइम्स टीव्ही’ला मुलाखत दिली. यावेळी बोलताना ती म्हणाली, “या बातम्या केवळ अफवा आहेत. या बातम्यांमध्ये अजिबात तथ्य नाही. आणि मला अशा बातम्यांवर पुन्हा पुन्हा ऊर्जा वाया घालवायची नाही”.

आणखी वाचा – “राखी सावंतबरोबरच लग्न मान्य नाही”, दुसऱ्या लग्नानंतर आदिल खानचं भाष्य चर्चेत, म्हणाला, “मी मुस्लिम आहे म्हणून…”

View this post on Instagram

A post shared by ???????????????????????? ???????????????????? ????????‍♀️???? (@mmoonstar)

काल १३ मार्चच्या दुपारी एका वृत्तवाहिनीने असा दावा केला होता की, बबिता जी आणि टप्पू म्हणजेच मुनमुन व राज यांनी गुपचूप साखरपुडा केला. यानंतर इंटरनेटवर खळबळ उडाली होती. दोघांनी गुजरातमधील वडोदरा येथे कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांनी हा साखरपुडा उरकला असल्याचंही समोर आलं. मात्र या चर्चा खोट्या असल्याचं सांगत मुनमुन व राज यांनी सांगितलं.

आणखी वाचा – Video : विमान प्रवासा दरम्यान झालेल्या गैरसोयीवर भडकला सिद्धार्थ जाधव, राग व्यक्त करत म्हणाला, “माझ्या बॅगेचं हँडल…”

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये जेठालालची भूमिका अभिनेते दिलीप जोशी साकारत आहेत. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी हे पात्र घराघरात प्रसिद्ध केले. या शोमध्ये विवाहित जेठालाल यांची बबिता जी क्रश आहे. दरम्यान जेठालालचा मुलगा टप्पूबरोबर तिच्या लग्नाची बातमी आली तेव्हा बहुतेक लोकांनी जेठालालचा उल्लेख केला.

Tags: munmun dattamunmun datta instagrammunmun datta posttv actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
actress Farida Jalal

शाहरुख खानची ऑनस्क्रीन आई सध्या करते तरी काय?, सतत ५० वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर कुठे गायब झाली ‘ही’ अभिनेत्री?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.