शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मला नट म्हणून हिणवतात आणि…”, गोविंदाचा शिवसेनेत प्रवेश होताच अमोल कोल्हेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका, म्हणाले, “आपल्या सहकाऱ्यांना…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 29, 2024 | 5:22 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Amol Kolhe shared a post requesting Eknath Shinde After Govinda joined ShivSena

“मला नट म्हणून हिणवतात आणि...”, गोविंदाचा शिवसेनेत प्रवेश होताच अमोल कोल्हेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका, म्हणाले, “आपल्या सहकाऱ्यांना...”

बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये गोविंदा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी गोविंदा मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत. गोविंदा यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची इच्छा आहे. त्यामुळे उत्तर-पश्चिम मुंबई म्हणजेच वायव्य मुंबई लोकसभा जागेसाठी शिवसेनेकडून नवीन चेहरा म्हणून गोविंदाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोविंदा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांकडून त्यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशाबद्दल प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच अभिनेते अमोल कोल्हे यांनीही गोविंदाच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमोल कोल्हेंनी सोशल मीडियावर एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी असं म्हटलं आहे की, “कोणत्याही कलाकाराचा कधी अपमान करु नये. एखाद्या कलाकाराचा अपमान म्हणजे पूर्ण सिनेसृष्टीचा अपमान असतो.”

View this post on Instagram

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

आणखी वाचा – कार्तिकी गायकवाडने गरोदरपणामध्ये पहिल्यांदाच शेअर केली पोस्ट, डोहाळे जेवणाच्या संपूर्ण कार्यक्रमाचीही दाखवली झलक, म्हणाली, “खास क्षण…”

अमोल कोल्हे यांनी एकनाथ शिंदेंचा हाच व्हिडीओ शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे आणि या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, “एकनाथ शिंदे साहेब आपल्या भावना अतिशय स्तुत्य आहेत. कलाकार हा आपल्या कलेने समाजाला प्रबोधन करणारा, समाजाला आरसा दाखवणारा माणूस असतो. परंतू आमच्या भागातील पूर्वी आपल्याच पक्षात असलेले व सध्या आपण दुसऱ्या पक्षाला उसने दिलेले एक गृहस्थ मला सतत नट म्हणून हिणवतात”.

आणखी वाचा – हिंदीनंतर मराठीमध्येही प्रदर्शित झाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट, रणदीप हुड्डाच्या भूमिकेला सुबोध भावेचा आवाज, म्हणाला, “अशी संधी…”

यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “माझ्या कलेच्या माध्यमातून मी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारत शिवशंभू विचार प्रत्येकाच्या मनात रुजविण्याचा सातत्याने प्रयत्न केला. केवळ आकस म्हणून मला ‘नट’ म्हणून हिणवने योग्य नाही. हे कृपया आपण आपल्या सहकाऱ्यांनाही सांगावे.” दरम्यान, या पोस्टद्वारे अमोल कोल्हेंनी या पोस्टद्वारे शिवाजी आढळराव पाटील यांना टोला लागावला आहे.

Tags: amol kolhemarathi actormarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Next Post
Tula shikvin Changalach Dhada Serial Promo

Video : भुवनेश्वरी-अक्षरा येणार समोरासमोर, उत्तराला प्रत्युत्तर मिळणार अन्…; प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्येही वाढली उत्सुकता

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.