प्रसिद्ध हिंदी टीव्ही शो ‘कौन बनेगा करोडपती’चे १५वे पर्व सध्या सुरु आहे. या पर्वाचे सूत्रसंचालन बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन करत आहेत. साहजिकच, अमिताभ बच्चन यांचा जगभरात खूप मोठा चाहतावर्ग आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना त्यांच्यासमोर येऊन बसण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे स्पर्धक व अमिताभ यांच्यातील संवाद बराच खुलताना दिसत आहे. कार्यक्रमादरम्यान स्पर्धकांशी संवाद साधताना ते अनेकदा आपल्या खासगी आयुष्याशी निगडित बऱ्याच गोष्टींचा उलगडा करत असतात. अशातच एका एपिसोडमध्ये त्यांनी त्यांच्या लहानपणीचा किस्सा सांगताना एक खुलासा केला आहे. (Amitabh Bachchan KBC 15)
‘कौन बनेगा करोडपती’च्या एका भागात हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाशी संवाद साधताना अमिताभ यांनी एक किस्सा सांगितला. त्यावेळी ते म्हणाले, “मी लहान असताना अलाहाबादमध्ये आम्ही बाहेर झोपायचो. कारण, त्यावेळी घरात खूप गरम व्हायचं. एक दिवस मी झोपलो असताना माझ्या हातावर बेडूक येऊन बसला. त्याला वाटले, की इथे काहीतरी खायला आहे म्हणून त्याने जीभ बाहेर काढली. तेव्हा मला समजले की, काही खाण्यासाठी बेडूक आपली जीभ बाहेर काढतात. तेव्हापासून मी माझे हात कधीही बाहेर काढत नाही, नेहमी माझ्या खिश्यात ठेवतो.”
हे देखील वाचा – Video : …अन् अशोक सराफ यांना रडू कोसळलं, ‘सारेगमप’च्या मंचावर नेमकं काय घडलं?
पुढे अमिताभ यांनी त्यांच्या आरोग्याचे गुपित सांगताना ते रोज रात्री हळदीचे सेवन असल्याचा खुलासा केला आहे. ते म्हणाले, “हळदीमध्ये चांगले औषधी गुणधर्म असून जर एखाद्या व्यक्तीने पाण्यात हळद घालून ते नियमित प्यायले, तर त्याचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे मी रोज झोपण्यापूर्वी पाण्यात हळद घालून पितो.”
हे देखील वाचा – प्रभासच्या ‘सालार’ चित्रपटाची तारीख पुढे ढकलली, निर्मात्यांकडून मोठी घोषणा
महानायक अमिताभ बच्चन मागील १४ वर्षांपासून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. त्यांच्या सूत्रसंचालनाचा एक वेगळा चाहतावर्ग बनलेला आहे. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाच्या १५व्या पर्वाला सुरुवात झाली आहे. त्यालादेखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या शोमध्ये आजवर अनेक स्पर्धकांनी विविध बक्षिसे जिंकली आहे. पंजाबच्या जसकरण सिंगने १ कोटी रुपयांचे बक्षिस जिंकत यंदाच्या पर्वातील पहिला करोडपती होण्याचा मान मिळवला आहे.