सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नसीरुद्दीन शाहांच्या ‘त्या’ टीकेवर नाना पाटेकरांचं सडेतोड उत्तर, म्हणाले, “राष्ट्रवादाच्या नावाखाली लोकांनी पैसे…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 14, 2023 | 10:18 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Nana Patekar Reacted On Naseeruddin Shah

नसीरुद्दीन शाहांच्या 'त्या' टीकेवर नाना पाटेकरांचं सडेतोड उत्तर, म्हणाले, "राष्ट्रवादाच्या नावाखाली लोकांनी पैसे..."

बॉलिवूड अभिनेता नसीरुद्दीन शाह सध्या ‘द काश्मीर फाईल्स’ व ‘गदर 2’ चित्रपटावर केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. हे चित्रपट मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहेत हे पाहून त्रास होतोय असं वक्तव्य एका अभिनेत्याने केले. यावरून चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनीही अभिनेत्याच्या या विधानावर जोरदार प्रहार केला. विवेक यांनी असं म्हटलं की, अनुभवी अभिनेत्याला कदाचित फक्त दहशतवाद्यांचे समर्थन करणे आवडते. विवेक अग्निहोत्रीच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटात मराठमोळे अभिनेते नाना पाटेकर दिसणार आहेत. त्यांना या वक्तव्या प्रकरणी विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी सडेतोड भाष्य केलेलं पाहायला मिळालं. हे वक्तव्य करणारा अभिनेता म्हणजे नसीरुद्दीन शाह. (Nana Patekar Reacted On Naseeruddin Shah)

नाना पाटेकर यांना नसीरुद्दीन शाहांच्या वक्तव्याबद्दल त्यांचं मत विचारण्यात आलं. त्यावर नाना म्हणाले, “तुम्ही नसीर यांना विचारलं होतं का की त्यांच्यासाठी राष्ट्रवाद म्हणजे काय? माझ्या मते, राष्ट्रावर प्रेम दाखवणे हा राष्ट्रवाद आहे आणि ती वाईट गोष्ट नाही,” असं ते म्हणाले. “’गदर’ हा चित्रपट ज्या प्रकारचा आहे, त्यात तसा आशय असेल आणि मी ‘द केरला स्टोरी’ पाहिला नाही, त्यामुळे मी त्यावर भाष्य करू शकत नाही. “राष्ट्रवादाच्या नावाखाली लोकांनी पैसे कमावणे योग्य नाही, सत्य घटनांवर चित्रपट बनवताना त्यांनी वस्तुस्थिती लक्षात ठेवली पाहिजे,” असंही नाना पाटेकर यांनी नमूद केलं.

आणखी वाचा – “तेव्हापासून मी माझे हात…” ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर खुद्द अमिताभ बच्चन यांनी सांगितला लहानपणीचा किस्सा, म्हणाले, “तेव्हा मला समजले”

नसीरुद्दीन शाह यांनी केलेलं वक्तव्य असं होत की, “मी ‘द केरला स्टोरी’ किंवा ‘गदर २’सारखे चित्रपट पाहिलेले नाहीत. पण त्यात नेमकं काय दाखवलं जात आहे ते मला चांगलंच ठाऊक आहे. ही फार चिंताजनक बाब आहे की ‘द काश्मीर फाइल्स’सारखे चित्रपट हिट होत आहेत, पण सुधीर मिश्रा, अनुभव सिन्हा, हंसल मेहता यांचे चित्रपट प्रेक्षक पाहत नाहीत. त्यामुळे या दिग्दर्शकांनी या गोष्टींमुळे न डगमगता त्यांचे चित्रपट लोकांसमोर आणायला पाहिजेत असं मला वाटतं,” असं नसीरुद्दीन शाह म्हणाले होते.

आणखी वाचा – प्रभासच्या ‘सालार’ चित्रपटाची तारीख पुढे ढकलली, निर्मात्यांकडून मोठी घोषणा

नाना पाटेकर लवकरच विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटात दिसणार आहेत, जिथे ते कोविड लसीचे निर्माते डॉ. भार्गव यांची भूमिका साकारणार आहेत. याशिवाय त्यांनी अनिल शर्माचा आगामी चित्रपट ‘जर्नी’ देखील साइन केला असल्याचं समोर आलं आहे.

Tags: entertainmentnana patekarnaseeruddin shah
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Mitali Mayekar Video

दुबईमध्ये मजा-मस्ती करत आहेत सिद्धार्थ-मिताली, बायकोचा 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणतो, "मी मोठी झाली म्हणते आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.