Kranti Redkar Video : बाप-लेकीचं खास बॉण्ड नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक मुलगी ही वडिलांसाठी सर्वकाही असते. वडिलांचं लेकीवरील प्रेम आणि लेकीचं वडिलांवरील प्रेम अतूट आहे. अशीच नेहमीच चर्चेत असणारी बाप-लेकीची क्युट जोडी म्हणजे समीर वानखेडे आणि त्यांच्या मुली झिया व झिदा. क्रांती रेडकर आणि तिचे पती समीर वानखेडे त्यांच्या जुळ्या मुलींमुळे नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावर अभिनेत्री क्रांती रेडकर नेहमीच चर्चेत असते. लेकींचे गमतीशीर व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच क्रांतीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओमध्ये क्रांतीच्या लेकीने धुमाकूळ घातला आहे.
क्रांतीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये समीर त्यांच्या मुलांना वेळ देताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये समीर यांच्या जवळ येत छबिल त्यांची लेक रडताना दिसत आहे. याच कारणही त्यांनी सांगितलं आहे. क्रांतीने छबिल व गोदो यांचे बाबा तिचे आहेत असं म्हंटलं हे काही तिच्या लेकीला आवडलेलं नाही. छबिलच्या मते तिच्या वडिलांवर आईचा नाही तर केवळ तिचा अधिकार आहे आणि ते फक्त तिचे आहेत. क्रांतीने समीर तिचे असल्याचं म्हणताच तिच्या लेकीने रडून आक्रोश केलेला पाहायला मिळाला.
आणखी वाचा – “जाण्याची वेळ झाली”, अमिताभ बच्चन यांच्या पोस्टची चर्चा, चाहते अस्वस्थ, म्हणाले, “काय झाले सर?”
हा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने ‘या घरातील माझे स्थान प्रभावीपणे घेतले आहे’, असं कॅप्शन दिलं आहे. क्रांतीने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेकजण या व्हिडीओला पसंती दर्शवित आहे. शिवाय अनेकांनी या व्हिडीओखाली कमेंट करत हे खरं असल्याचं म्हटलं आहे.
आणखी वाचा – यामी गौतम धर लेकाचा चेहरा दाखवणारच नाही, पतीसह मिळून मोठा निर्णय, कारण सांगत म्हणाली…
क्रांती व समीर यांना दोन जुळ्या मुली आहेत. झिया व झिदा अशी त्यांच्या मुलींची नाव आहेत. लाडाने ती तिच्या लेकींना छबिल व गोदो अशी हाक देते. क्रांतीने सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या वडिलांबरोबरच्या व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये बाप-लेकीचं अनोखं नातं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे.