बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री अमला पॉल आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. मात्र, यंदाचा वाढदिवस तिच्यासाठी विशेष ठरला आहे. अभिनेत्रीने आपल्या वाढदिवशी तिच्या नात्याची घोषणा केली आहे. अभिनेत्री अमला पॉल लवकरच तिचा बॉयफ्रेंड जगत देसाईशी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेत्रीने तिच्या या नात्याची घोषणा सोशल मीडियावर शेअर केली. ही आनंदाची बातमी समोर येताच चाहत्यांनी अमला व तिच्या भावी पतीवर शुभेच्छांचा वर्षाव केला. (Amala Paul got engaged to her Boyfriend)
अमला पॉलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये तिच्या बॉयफ्रेंडने “अखेर माझ्या जिप्सी क्वीनने मला होकार दिला.”, असं म्हणत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ एका हॉटेलमधील आहे. ज्यामध्ये ती तिचा बॉयफ्रेंडबरोबर थिरकताना दिसते. त्यानंतर तिच्या बॉयफ्रेंडने गुडघ्यावर बसून तिला लग्नासाठी मागणी घातली. तेव्हा तिने होकार दिला आणि त्यानंतर दोघांनी एकमेकांना लिपलॉक करत मिठी मारली.
हे देखील वाचा – अमृता रावने सेटवर शिवीगाळ करताच ईशा देओलने तिच्या कानाखाली मारली अन्…; तेव्हा नेमकं काय घडलं होतं?
यावेळी अमला ही गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसून आली, तर तिचा होणारा पती खाकी रंगाचा जॅकेट, पांढरा टी-शर्ट, आणि जीन्स पॅन्टमध्ये सुंदर दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत असून चाहत्यांनी या जोडीवर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, अमला ही दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार असून तिचं पहिलं लग्न हे प्रसिद्ध दिग्दर्शक एएल विजय यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र हे लग्न अवघं काही काळ टिकलं. याआधीही तिचं नाव अनेक अभिनेत्यांसह जोडलं गेलं होतं.
हे देखील वाचा – Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेच्या वैवाहिक आयुष्यात वादळ येणार?, विकीच्या प्रेमात आहे सना, धक्कादायक गोष्ट येणार समोर
अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, तिने हिंदीसहित अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे. २००९ मध्ये आलेल्या ‘नीलथमारा’ या मल्याळम चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पाऊल टाकले. त्यानंतर तिने अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांबरोबर काम केलेलं आहे. तर यावर्षी प्रदर्शित झालेल्या अजय देवगणच्या ‘भोला’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.