सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेच्या वैवाहिक आयुष्यात वादळ येणार?, विकीच्या प्रेमात आहे सना, धक्कादायक गोष्ट येणार समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 26, 2023 | 3:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss 17 Update

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेच्या वैवाहिक आयुष्यात वादळ येणार?, विकीच्या प्रेमात आहे सना, धक्कादायक गोष्ट येणार समोर

‘बिग बॉस १७’ च्या यंदाच्या पर्वात सुरुवातीपासूनच वाद सुरु झाले आहेत. स्पर्धकांमध्ये वर्षीची लढत पाहायला मिळतेय. अशातच सना रईस खान आणि अभिषेक कुमार यांच्यात जोरदार वाद झालेला पाहायला मिळाला. सर्वजण बागेत बोलत असताना ‘बिग बॉस’ने सनाला माईक नीट घालण्यास सांगितले. यावर अभिषेकने विनोद केला ज्याचा सनाला राग आला. अभिषेकला उत्तर देत सना म्हणाली, ती त्याच्यासारखी फुटेज घेणारी नाही आहे, यावरून त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. (Bigg Boss 17 Update)

अभिषेक कुमार यावेळी सांगताना दिसला की, “जेव्हापासून सनाला नॉमिनेट करण्यात आले आहे, तेव्हापासून तिच्या वागणुकीत बदल झाली आहे. सना विकीने सांगितलेली प्रत्येक गोष्ट पुन्हा सांगत होती”, असा दावाही त्याने केला. त्यामुळे सना चिडली आणि नंतर ती विकी जैनसोबत बोलू लागली. सना व विकी जैन बोलत असताना मन्नारा चोप्रा आणि अनुराग डोवाल त्यांना पाहतात. मन्नारा अनुरागला ‘विकी सनाशी कसं बोलतोय’ हे बघायला सांगते. त्यानंतर ती विकी व सनाच्या पूर्वीच्या संभाषणाबद्दल सांगते, त्यांनी असा दावा केला होता की, अंकिता लोखंडे त्यांच्या नात्याबद्दल असुरक्षित आहे. मन्नाराने अनुरागला पुढे असेही सांगितले की, तिला वाटते की सना विकी जैनला पसंत करतेय.

आणखी वाचा – “हे नवरे लोक…”, वनिता-सुमितच्या फोटोवर हेमांगी कवीची कमेंट, वनिताच्या नवऱ्याचं उत्तर, म्हणाला, “पुढच्या वेळेपासून…”

आजच्या भागात असेही पाहायला मिळणार आहे की, ‘बिग बॉस’ने स्वयंपाकघरातील स्वयंपाकाशी संबंधित नवीन नियमावली जाहीर केली होती. बिग बॉसच्या नियमानुसार स्वयंपाकघर दिवसातून फक्त तीन वेळा चालेल, तेही मर्यादित कालावधीसाठी आणि प्रत्येक खोलीतील लोक फक्त त्यांच्या खोलीसाठी अन्न शिजवतील. अशातच काही खोल्यांमधील लोकांना अन्न शिजवण्यासाठी कमी वेळ मिळाला आणि गॅस बंद झाला, त्यामुळे ते संतापले. त्यानंतर अंकिता लोखंडे आणि ऐश्वर्या शर्मा यांनी रात्रीचे जेवण अगोदरच तयार करण्याचे ठरवले जेणेकरून त्यांचा गॅस संपल्यावर थोडा वेळ वाचू शकेल. यामुळे ‘बिग बॉस’ यांच्यावर चिडले आणि त्यांनी १२ मिनिटांसाठी गॅस पुरवठा खंडित केला.

View this post on Instagram

A post shared by Sana Raees Khan (@sanaraeeskhan)

आणखी वाचा – वडिलांची नोकरी गेली, आई नोकरी शोधण्यासाठी बाहेर पडली अन्…; प्रार्थना बेहरेने सांगितला ‘तो’ संपूर्ण प्रसंग, म्हणाली, “पैशांची अधिक गरज…”

शेवटी मन्नारा चोप्राचा संपूर्ण दिवस चढ-उतारांनी भरलेला पाहायला मिळाला. शिवाय अंकिता लोखंडे, खानझादी आणि मुनावर फारुकी यांच्याशी तिचा विकोपाला गेलेला वादही पाहायला मिळाला. मात्र, नंतर मन्नारा व मुनव्वर यांनी आपापसात सर्वकाही जुळवून घेतले.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Next Post
Esha deol slapped amrita rao

अमृता रावने सेटवर शिवीगाळ करताच ईशा देओलने तिच्या कानाखाली मारली अन्...; तेव्हा नेमकं काय घडलं होतं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.