Me Too चळवळीमुळे संपूर्ण बॉलिवूड हादरलं होतं. अनेक अभिनेत्रींनी दिग्दर्शक, निर्माते, कलाकारांविरोधात धक्कादायक खुलासे केले होते. शारीरिक संबंधांसाठी जबरदस्ती, लैंगिक शोषण अशा विविध घटना बॉलिवूडमधून समोर आल्या. त्यामध्येच आणखी एका सुप्रसिद्ध गायकाचं नाव समोर आलं. ते म्हणजे अनू मलिक. अनू यांच्यावर शारिरीक छळ केला असल्याचे आरोप करण्यात आले होते. दरम्यान काही महिन्यांमध्ये हे संपूर्म प्रकरण शांत झालं. आता याचबाबत अमाल मलिकने पहिल्यांदा भाष्य केलं आहे. अनू अमालचे काका आहेत. अनू यांच्यावर जेव्हा आरोप करण्यात आले तेव्हा अमालने त्यांच्याशी संपर्कही साधला नाही. याचबाबत त्याने सविस्तर सांगितलं आहे. (amaal mallik talk about me too allegations on anu mallik)
सोना महापात्राने अनू यांच्यावर शारीरिक शोषणाबाबत आरोप केले होते. अमालचं म्हणणं आहे की, तो सोनाला अगदी जवळून ओळखतो. त्यामुळे ती कोणावरही काहीही आरोप करणार नाही. अमाल म्हणाला, “Me Too चे आरोप अनू यांच्यावर करण्यात आले. तेव्हा मी त्यांच्याशी संवादही साधला नाही. मी त्यांना कोणत्याच प्रकारचा पाठिंबाही दिला नाही. कारण माझा या सगळ्या गोष्टींशी काहीही संबंध नव्हता”.
पुढे अमाल म्हणाला, “या सगळ्या गोष्टी जेव्हा माझ्या कानावर आल्या तेव्हा मला खूप लाज वाटली. सोना महापात्रा, श्वेता पंडित यांसारखे लोक त्यांच्या विरोधात बोलत होते तर काहीतरी तथ्य असणार असं मला वाटतं. आग लागल्याशिवाय सगळीकडे धूर पसरत नाही. पाच लोक एकाच व्यक्तीच्याविरोधात का बोलतील?. सोना बऱ्याच विषयांवर अगदी हुशारीने तिचं मत मांडते. मी तिला ओळखतो. कोणावरही ती खोटे आरोप करणार नाही याची मला खात्री आहे”.
आणखी वाचा – “बॉलिवूडमध्ये फक्त पैशांचा खेळ”, संजय दत्तची खंत, दाक्षिणात्य चित्रपटांचं कौतुक करत म्हणाला, “सगळं काही…”
“अनू यांच्यावर जे काही आरोप झाले ते खोटे असूदेत ही माझी इच्छा आहे. पण सगळे आरोप खोटे असतील हे मी सांगू शकत नाही. अनू यांच्याबरोबर असलेलं माझं नातं पाहता मी सार्वजनिकरित्या त्यांना सन्मान देतो. पण त्यांची वाईट कामं पाहता माझं त्यांच्याबरोबरचं नातं आता चांगलं नाही. माझं त्यांच्या कुटुंबाबरोबरही आता कोणतंच नातं नाही. काही वर्ष मी त्यांना भेटलोही नाही. मी पार्टीलाही जात नाही. अरमानच्या लग्नात त्यांना बोलावण्यात आलं होतं. ते आलेही होते”. पुढे अमाल म्हणाला, “माझ्या वडिलांनीही मला विचारलं की, अनू यांच्यासारखे आरोप तुझ्यावर केले तर… तेव्हा त्यांना मी म्हटलं की, असं होऊच शकत नाही. गाणं गायल्यानंतर मी मुलींकडे शारीरिक मागणी करत नाही. माझ्याबरोबर असणाऱ्या मुलींना सुरक्षितच वाटतं”. अमालने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये भाष्य केलं.





