रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बॉलिवूडमध्ये फक्त पैशांचा खेळ”, संजय दत्तची खंत, दाक्षिणात्य चित्रपटांचं कौतुक करत म्हणाला, “सगळं काही…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 14, 2025 | 2:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sanjay dutt on bollywood

“बॉलिवूडमध्ये फक्त पैशांचा खेळ”, संजय दत्तची खंत, दाक्षिणात्य चित्रपटांचं कौतुक करत म्हणाला, “सगळं काही...”

गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूड चित्रपटांची गणितं काहीशी बदलेली दिसत आहेत. ड्रामा, कॉमेडी, एक्शन सीन्स सगळं काही पाहता चित्रपटांचं कथानकच रट्याळ असल्याच्या विविध प्रतिक्रिया समोर येतात. कित्येक कलाकारही बॉलिवूड चित्रपटांमध्ये अलिकडे काहीच रस नसल्याचं अगदी उघडपणे बोलतात. शिवाय इंडस्ट्री म्हणजे निव्वळ पैशांचा खेळ आणि व्यवसाय झाला असल्याचीही अनेकांची भावना आहे. अशातच संजय दत्तनेही आता याबाबत मोठं विधान केलं आहे. बॉलिवूडमध्ये मेहनत कमी आणि पैशांसाठी अधिकाधिक काम सुरु असल्याचं त्याचं म्हणणं आहे. फक्त पैशांकडे पाहता कामाची गुणवत्ता कमी होत असल्याचं संजयचं मत आहे. त्याने इंडस्ट्रीची खरी परिस्थिती सगळ्यांसमोर मांडली आहे. (Sanjay dutt on bollywood)

अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत संजयने अनेक विषयांवर भाष्य केलं. दाक्षिणात्य चित्रपटात तो अगदी रमला आहे. पण दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये सगळेच अगदी आवडीने आणि जिद्दीने काम करतात असं संजयचं म्हणणं आहे. मात्र बॉलिवूड हेच सगळं हरवून बसला आहे असं स्पष्ट शब्दांत संजयने सांगितलं. कामाप्रती बॉलिवूडचं असणारं वेड त्याला पुन्हा आणायचं आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध खलनायकाच्या अंत्यसंस्काराला एस. एस. राजामौलीच्या ‘त्या’ कृतीची चर्चा, चाहत्याला ढकललं आणि…; पाहताच नेटकरी भडकले

View this post on Instagram

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

संजय म्हणाला, “टॉलिवूडची काम करण्याची आवड बॉलिवूडमध्ये पुन्हा आणायची माझी इच्छा आहे. बॉलिवूडने जिद्द आणि आवड गमावली आहे. ही एकच गोष्ट आहे जी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच्या तुलनेत आपल्या देशात कमी आहे. त्याचं मला वाईट वाटतं. एक चांगला चित्रपट बनवण्याची आवड आणि जिद्द हवी. चांगला चित्रपट म्हणजे फक्त भरपूर आकडे नाहीत. बॉलिवूडमध्ये सगळं काही पैशांसाठी आहे. पण हे सगळं पैशांसाठी करु नये. आवड आणि जिद्द म्हणून चित्रपट करावेत”.

आणखी वाचा – कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, धोका टळला नाही, स्वतःच म्हणाली, “आता…”

‘द राजा साब’मध्ये संजयने प्रभासबरोबर काम करणार आहे. याचबाबत त्याने सांगितलं की, “तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की, मी तेलुगू भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहे. कारण मी प्रभासबरोबर आणखी एक चित्रपट करत आहे. द राजा साब नावाचा चित्रपट मी करत आहे. प्रभास मला खायलाही खूप देतो. सगळ्यात चांगल्या व्यक्तींपैकी एक प्रभास आहे. तसेच तो सर्वोत्तम अभिनेताही आहे”. संजयने प्रभासचं अगदी भरभरुन कौतुक केलं.

Tags: bollywood newsentertainment newssanjay dutt
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Payal Rohatgi Planning Baby Via Surrogacy

सरोगसीद्वारे बनणार आई, सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नवऱ्याचा खुलासा, म्हणाला, "आम्ही प्रयत्न…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.