शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“भात लावण्याची ही कोणती पद्धत?”, नेटकऱ्याच्या प्रश्नावर भडकला अभिजीत केळकर, म्हणाला, “इंस्टाग्रामवर चिखल करण्यापेक्षा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 14, 2025 | 5:23 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
abhijeet kelkar farming video

"भात लावण्याची ही कोणती पद्धत?", नेटकऱ्याच्या प्रश्नावर भडकला अभिजीत केळकर, म्हणाला, "इंस्टाग्रामवर चिखल करण्यापेक्षा…"

abhijeet kelkar farming video : कोकण म्हणजे स्वर्ग. आणि हो आता पावसाळ्यात या स्वर्गाचा आनंद लुटण्यासारखं सुख नाही. निळाशार समुद्र. हिरवळ, साधी भोळी माणसं या सगळ्याने समस्त कोकण सजलेलं आहे. पावसाळा सुरु झाला की प्रत्येकाला कोकणात, शेतीसाठी गावाकडे जायची ओढ ही लागून राहते. अनेकजण याचा आनंद घेण्यासाठी कोकणाची वाटही धरतात. अशातच आता एक मराठमोळा अभिनेताही कोकणात शेती करताना दिसतोय. शेतीत तो व्यस्त असल्याचं दिसत आहे. थेट कोकणातून त्याने शेतात राबतानाचा व्हिडीओ, फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा अभिनेता म्हणजे अभिजीत केळकर. ‘बिग बॉस’ फेम अभिनेता सध्या कोकणात त्याचा अमूल्य वेळ घालवताना दिसत आहे.

अभिजीत केळकरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेतीकामाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो शेतात नांगरणी करताना दिसत आहे. शिवाय शेतात बसून तो जेवणाचा आनंद घेतानाही दिसत आहे. “कोकणात जन्म घ्यायला आणि यायला नशीब असावं लागतं”, असं कॅप्शन देत त्याने हा व्हिडीओ, फोटो पोस्ट केला आहे. यावर नेटकऱ्यांनी अभिजीतला ट्रोल केलं आहे. “भात लावण्याची ही कोणती पद्धत?”, असा सवाल अभिजीतच्या पोस्टवर नेटकऱ्याकडून करण्यात आला आहे.

आणखी वाचा – सरोगसीद्वारे बनणार आई, सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नवऱ्याचा खुलासा, म्हणाला, “आम्ही प्रयत्न…”

View this post on Instagram

A post shared by Abhi Kelkar (@abhijeetkelkar21)

यावर शांत न बसता अभिजीतने उत्तर देतं म्हटलं नेटकऱ्यांना सुनावलं आहे. “अशी इंस्टाग्रामवर बसून, नुसतं वाईट कमेंट्स करुन ती नाहीच कळणार, इंस्टाग्रामवर चिखल करण्यापेक्षा या खऱ्या चिखलात उतरुन बघ, लगेच कळेल”, असं म्हणत अभिजीतने पोस्टवर कमेंट करणाऱ्याला उत्तर दिलं आहे. तर एक महिला नेटकऱ्याने कमेंट करत, “तेल लावत गेला तुझा कोकण. आमच्या भागात येऊन बघ राजांचे किल्ल्लेच किल्ले आहेत”, असं म्हटलं आहे. यावरही अभिजीतने कमेंट करत, “चांगलच आहे की मग ताई, त्याचा अभिमान बाळगा, मलाही त्याचा अभिमानच आहे, महाराज माझेही आहेतच की, तुम्हाला अशी भाषा शोभत नाही पण विचार करुन बघा ताई. देव तुम्हाला लवकर बरं करो”, अशा मोजक्या शब्दात चांगलीच चपराक दिली आहे.

आणखी वाचा – “आग लागल्याशिवाय धूर येत नाही”, अनू मलिक यांच्यावरील शारीरिक छळाच्या आरोपांवर अमाल मलिकचं भाष्य, चूक होती म्हणूनच…

तर काहींनी अभिजीतला शेतात काम करताना पाहून त्याचं भरभरुन कौतुक केलं आहे. “मातीशी नाळ जोडलेली म्हणतात ना ते हेच. अभिनयात उंची असलेला आणि जमिनीवर पाय असेलेला अभिनेता”, “बरोबर आहे सर,कोकण म्हणजे स्वर्ग”, “अभिमान वाटतो की माणूस किती मोठा झाला तरी आपल्या गावाला विसरला नाही. दादा मी बघितलं दरवर्षी तुम्ही येता माहिती आहे. मी तुमचे व्हिडीओ पहिले आहेत”, “खरंच आहे कोकणात जन्म घ्यायला नशीबच लागतं”, असं म्हणत अनेकांनी अभिजीतचं कौतुक केलं आहे.

Tags: abhijeet kelkarfarming videomarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Ronit roy on saif ali khan attack

सैफ अली खाननंतर करीना कपूरवरही हल्ला करण्याचा प्रयत्न, रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा, गाडीमध्येच असताना...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.