भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित असा ६९व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. ज्यामध्ये अनेक बॉलीवूड व साऊथच्या चित्रपटांनी अनेक पुरस्कारांवर नाव कोरले आहे. पण, यात एका नावाची सर्वात जास्त चर्चा झाली, ती म्हणजे साऊथचा आयकॉन स्टार अल्लू अर्जुनाची. अल्लू अर्जुनने “पुष्पा १ : द राईज” चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. विशेष म्हणजे, त्याचा हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार असून यासह तो सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारा पहिला तेलगू अभिनेता ठरला आहे. (Allu Arjun wins National Awards)
२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अल्लू अर्जुनने मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपटातील अल्लूचा लुक आणि त्याचा ॲक्शनपॅक अवताराला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली होती, शिवाय अनेक पुरस्कारांनी त्याला सन्मानित करण्यात आले होते.
दरम्यान, राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अल्लू अर्जुनच्या घरी जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले होते. जेव्हा अल्लूच्या नावाची घोषणा झाली, तेव्हा त्याने त्याच्या बायको आणि मुलाला उचलून घेतलं. चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार यांना घट्ट मिठी मारली, त्यावेळी ते दोघे भावुक झाले होते. या क्षणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यावर चाहते अभिनेत्याचे अभिनंदन करत आहे.
हे देखील वाचा – “भारावून जाणार नाही कारण…”, राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर आलिया भट्टची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, “हा पुरस्कार…”
Happiest Wife Now ❤️☺️@alluarjun #AlluArjun𓃵 #AlluSneha #NationalAwards pic.twitter.com/DVyn8QIf7X
— AA-SUNNY-JAGUN-SIDDHAM 🔥🤙 (@Ikunasanyasirao) August 24, 2023
पुरस्काराच्या घोषणेनंतरचा आणखी एक व्हिडिओ समोर आला असून, ज्यात तो घराबाहेर चाहत्यांचे अभिवादन स्वीकारताना दिसतोय. शिवाय, या जल्लोषाचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा – राष्ट्रीय पुरस्कारांच्या शर्यतीत कंगना रणौतचा पराभव, आलिया भट्ट व क्रिती सेनॉनला पुरस्कार जाहिर झाल्यानंतर म्हणाली, “निराश झालेल्या…”
Icon star @alluarjun wishing the fans outside his home who came to congratulate him for winning #NationalAward ❤️#AlluArjun𓃵 #Pushpa pic.twitter.com/kW2EQeld9w
— All India Allu Arjun Fans & Welfare Association (@AIAFAOnline) August 24, 2023
यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारात ‘पुष्पा १ : द राईज’ ने दोन पुरस्कारांवर नाव कोरलं आहे. ज्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासह सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्काराचा समावेश आहे. ‘पुष्पा १’च्या यशानंतर अल्लू अर्जुन लवकरच ‘पुष्पा २ : द रुल’ हा चित्रपट घेऊन येणार आहे. ज्याची चाहते व प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. (Allu Arjun wins National Awards)