सालस, सोज्वळ याचबरोबर सोशिक, घरेलू टाईप अशा स्वभावांत मोडणारी मराठी सिनेमाविश्वातील नामवंत अभिनेत्री म्हणजे अलका कुबल. रडूबाई, सोशिक असा भूमिकेच्या प्रकारात अलका कुबल या नावाचा स्टॅम्प बसणार असं कुठेतरी वाटत असलं तर अलका यांनी मात्र काही तसं घडू दिल नाही. अलका यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अद्याप त्यांच्या नावावर वाटणारी चौकट मोडून विविधअंगी भूमिका साकारल्या आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान कमावलं. सिनेमाविश्वात कोणीही गॉडफादर नसताना केवळ स्वमेहनतीवर अलका यांनी शून्यातून स्वतःच यशस्वी असं विश्व साकार केलं आहे.(Alka Kubal Lovestory)
आपल्या बरोबरीने कलाकारांना घेऊन पुढे जात काम करण्याचा अलका यांचा स्वभाव सगळ्यानांच ज्ञात आहे. अलका यांनी लेक चालली सासरला या चित्रपटातून सिनेमासृष्टीत पदार्पण केलं. माहेरची साडी या चित्रपटानंतर अलका यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. आजही त्या माहेरची साडी चित्रपटातील भूमिकेमुळे ओळखल्या जातात. अलका यांनी माहेरची साडी चित्रपटानंतर सात ते आठ महिन्यांनी त्यांचा विवाहसोहळा
उरकला. अलका कुबल या अलका आठल्ये झाल्या. अलका कुबल यांनी त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल एका मुलाखतीत सांगितलं आहे, चला तर जाणून घेऊया अलका कुबल यांच्या प्रेमकहाणीबद्दल आजच्या जपलं ते आपलं या भागात.
पाहा का केला अलका यांच्या लग्नाला त्यांच्या आईने विरोध (Alka Kubal Lovestory)
अलका कुबल यांचा विवाह प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर समीर आठल्ये यांच्याशी झाला आहे. अलका कुबल यांनी सांगितलं की, बरेच सिनेमे आम्ही एकत्र केले, मी पडद्यावर आणि तो पडद्याच्या पलीकडे असं सुरूच असायचं. आमचा मित्रमंडळींचा एक ग्रुपही होता. बरेच सिनेमे एकत्र केले त्यानंतर तो मला आवडू लागला. आम्ही बरेचदा एकत्र फिरायला ही जायचो. प्रेमात पडलो तरी मला काही समीरने प्रपोज केलं नाही, किंवा लग्नाचं विचारलं नाही. शेवटी माझ्या घरून विचारायला लागले की तू याच्यासोबत फिरतेस मग लग्नाचं कसं काय? (Alka Kubal Lovestory)
हे देखील वाचा – ‘वादळापूर्वीची शांतता..’ असं म्हणत केदार शिंदेंची रोहिणी यांच्यासाठीची पोस्ट चर्चेत
त्यानंतर मी स्वतः समीरला विचारलं की आपण कधी करायचं लग्न. त्यानंतर मग समीरने त्याच्या घरी सांगितलं आणि मग माझ्या घरचे आणि समीरच्या घरचे भेटले. दरम्यान माझ्या लग्नाला माझ्या आईचा थोडासा विरोध होता. एकाच इंडस्ट्रीत काम करत असल्याने तिचा खरतर नकार होता. शेवटी इंडस्ट्रीत काम करताना ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग आहे की त्याला किती यश मिळेल. जेव्हा समीरच्या घरचे आणि माझ्या घरचे भेटले, आमचं बोलणं झालं त्यानंतर आई थोडीशी convience झाली.
अलका कुबल यांचा सुखाचा संसार सुरु असून त्यांना दोन मुली आहेत, त्यांच्या दोन्ही मुली वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची एक लेक ही कमर्शिअल पायलट आहे. अलका कुबल आणि समीर आठल्ये यांची निर्मिती संस्था देखील आहे.