मराठीतील आघाडीचे दिग्दर्शक केदार शिंदे गेल्या काही दिवसांपासून खूपच चर्चेत आहे. ‘अग्गबाई अरेच्चा…’, ‘जत्रा’, ‘गलगले निघाले’, ‘श्रीमंत दामोदरपंत’ अशी दर्जेदार चित्रपट केदार यांनी दिग्दर्शित केलेली आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या शाहीर साबळेंच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ बॉक्स ऑफिसवर बंपर हिट झाल्यानंतर केदार ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून चित्रपटाबद्दलच्या विविध प्रतिक्रिया समोर येत आहे.(Aadesh bandekar Kedar shinde)
केदार यांचा ‘बाईपण भारी देवा’ ची कथा सहा सख्ख्या बहिणींभोवती फिरणारं असलं, तरी एकूणच महिलांच्या भावविश्वाचं सुरेख चित्रण यात करण्यात आलंय. अन हेच सुंदर चित्रण महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांना पसंत पडला. छोट्या पडद्यावरील ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमातून तमाम महिलांना बोलतं करणारे अभिनेते आदेश बांदेकर यांनी काल ‘बाईपण भारी देवा’ पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर आदेश यांनी दिग्दर्शक केदार शिंदेला घट्ट मिठी मारत त्यांचे अभिनंदन केले व आपली प्रतिक्रिया दिली.
दिग्दर्शक केदार शिंदे यांनी हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला, ज्यात आदेश बांदेकर केदार यांना मिठी मारताना दिसत आहे. त्यावर केदार यांनी लिहिलंय, “गेली कित्येक वर्ष “होम मिनिस्टर” या कार्यक्रमाच्या निमित्ताने, दार उघड बये दार उघड म्हणत, वहिनींना मानाची पैठणी देणारा, त्यांचं मन जाणून घेऊन त्यांना बोलतं करणारा.. (Aadesh bandekar Kedar shinde)@aadesh_bandekar याने काल #baipanbhaarideva सिनेमा पाहून कडकडून मिठी मारली.. बायकांच्या जवळचा भावोजी जेव्हा अशी प्रतिक्रिया देतो तेव्हाच कळून चुकतं की, आपल्याला बायकांच्या मनातलं नुसतं ऐकू नाही तर समजू लागलंय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.”
‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा चौधरी या अभिनेत्री मुख्य भूमिकेत पाहायला मिळत असून त्यांच्यासह अभिनेते शरद पोंक्षे, पियुष रानडे यांच्याही चित्रपटात महत्वाची भूमिका आहेत.