Filmfare Awards 2024 : ‘फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२४’ (Filmfare Awards २०२४) हा हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यंदा गुजरात येथील गांधीनगरमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. ‘फिल्मफेयर अवॉर्ड्स २०२४’ करण जोहर, आयुष्मान खुराना व मनीष पॉल यांनी होस्ट केला. ‘फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२४’मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट्ट तर सर्वोत्कृष्ट अभिनेता रणबीर कपूरला पुरस्कार मिळाला. तर ‘१2th Fail’ या चित्रपटाने यंदाच्या फिल्मफेअरमध्ये बाजी मारली.
‘फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२४’मधील सेलिब्रिटींचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते त्यांच्या लाडक्या सेलिब्रिटींचं अभिनंदन करत आहेत. ‘फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२४’ने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दरम्यान या पुरस्कार सोहळ्यातील लक्षवेधी बाब ठरली ती म्हणजे ’12th Fail’ चित्रपट होय. एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल तीन पुरस्कार या चित्रपटाच्या नावावर आहेत.
अभिनेता विक्रांत मेस्सीचा ’12th Fail’ या सिनेमानं प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. काही महिन्यांपूर्वी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमानं फारसं प्रमोशन न करता थिएटरमध्ये तग धरून ठेवला. IPS अधिकाऱ्याच्या जिद्दीच्या कहाणीने फिल्मफेअरमध्ये बाजी मारलेली पाहायला मिळत आहे. विधु विनोद चोप्रा यांनी छोट्या बजेटमध्ये तयार केलेला सिनेमा सक्सेसफुल ठरला. लेखक अनुराग पाठक यांनी 2019साली लिहिलेल्या एका नॉन फिक्शन पुस्तकावर हा सिनेमा आधारित आहे. IPS अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या आयुष्यावर हा सिनेमा आहे.
यंदाच्या ‘फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२४’ मध्ये 12th Fail चित्रपटाने बाजी मारली. एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल चार पुरस्कार या चित्रपटाच्या नावे आहेत.
सर्वोत्कृष्ट चित्रपट -(12th Fail)
सर्वोत्कृष्ट अभिनेता विक्रांत मेस्सी (क्रिटिक्स)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – विधु विनोद चोपडा
सर्वोत्कृष्ट पटकथा – विधु विनोद चोप्रा