सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

चाहत्याने त्याच्या घरामधील भिंतीवर लावला समीर चौघुलेंचा फोटो, ते दृश्य पाहून अभिनेता भावुक, म्हणाले, “माझ्यासाठी ही अत्यंत…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 11, 2024 | 10:23 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Samir Choughule Fan Moment

चाहत्याने त्याच्या घरामधील भिंतीवर लावला समीर चौघुलेंचा फोटो, ते दृश्य पाहून अभिनेता भावुक, म्हणाले, "माझ्यासाठी ही अत्यंत..."

प्रत्येक कलाकाराचा खूप मोठा चाहतावर्ग हा असतो. प्रत्येक कलाकाराने त्याच्या अभिनयाच्या जोरावर हा त्याचा चाहतावर्ग निर्माण केला आहे. कलाकारावर हे चाहते निस्सीम प्रेम करतात. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्याने त्यांच्या चाहत्यांचा एक किस्सा सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. हा अभिनेता म्हणजे समीर चौघुले. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून समीर चौघुले घराघरांत पोहोचले. या कार्यक्रमामुळे समीर यांनी लाखो चाहत्यांच्या दिलावर राज्य केलं. चाहतेही समीर यांच्यासाठी वेडे असलेले पाहायला मिळाले. (Samir Choughule Fan Moment)

चाहत्यांच्या प्रेमापोटी समीर यांनी एक पोस्ट शेअर करत साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चाहत्याने काढलेला समीर यांच्या फोटोफ्रेमबरोबरचा एक फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिलं आहे की, “हे असे चाहते आहेत म्हणून जगण्याला अर्थ आहे. लहानपणी माझ्या घराच्या भिंतीवर मी माझ्या आवडत्या हिरोंचे फोटो लावायचो. अमिताभ बच्चन, ब्रूस ली, जॅकी चॅन, पु.ल देशपांडे, चार्ली चॅप्लिन (द कीड), कपिल देव यांचा (८३ चा वर्ल्डकप उचललेला) असे अनेक फोटो माझ्या घराच्या भिंतीवर, गद्रेच्या लोखंडी कपाटावर असायचे. तेव्हा खरंच वाटलं नव्हतं कोणी माझा फोटो आपल्या घराच्या भिंतीवर लावेल” असं ते म्हणाले.

आणखी वाचा – आयरा खान व नुपूर शिखरे यांचा विवाहसोहळा संपन्न, ख्रिश्चन पद्धतीने पार पडले लग्न, लूकनेही वेधलं लक्ष

View this post on Instagram

A post shared by Samir Choughule (@samirchoughule)

यापुढे त्यांनी लिहिलं आहे की, “निखिल माने या माझ्या चाहत्याने माझ्या प्रेमापोटी माझे चित्र (हस्त व हसत चित्र) आपल्या घरातील भिंतीवर लावले आहे. माझ्यासाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे. स्ट्रेस व नैराश्याने भरलेल्या जीवनात आपण नकळतपणे अनेकांच्या मनाला उभारी, ऊर्जा, आनंद मिळण्याचे निमित्त ठरतो. ही गोष्ट कधी कधी गहिवरून टाकते. चाहत्यांचे प्रेम गुदमरवून टाकतं. हास्याची ताकद किती मोठी आहे याची प्रचिती देणारी असंख्य उदाहरणे आम्ही हास्यजत्रेकरी रोज अनुभवतो. हे असे चाहते आणि त्यांचे प्रेम आमची कामाप्रतीची जबाबदारी वाढवतात आणि विनोदाकडे जास्त गांभीर्याने पाहायला लावतात” असं म्हणत चाहत्यांच्या प्रेमाबद्दल भाष्य केलं.

आणखी वाचा – “खूप दुःख सोसलं आहे पण…”, अंकिता लोखंडेला सासूने सुनावल्यानंतर पहिल्यांदाच बोलली अभिनेत्रीची आई, म्हणाली, “ज्यांनी तिच्याबरोबर वाईट केलं…”

पुढे ते म्हणाले आहेत की, “प्रत्येक प्रहसनात ५०० टक्के योगदान द्यायची उर्मी निर्माण करतात. प्रत्येक प्रयत्न सफल होतोच असं नाही. कधी उन्नीस बीस होतं पण १०० टक्के प्रयत्न आणि मेहनत करण्यात आम्ही कधीच तडजोड करत नाही. हे संपूर्ण श्रेय आमच्या हास्यजत्रेच्या कुटुंबाचे आहे. आमच्या सचिन मोटे व सचिन गोस्वामी सरांचे आहे. तसेच ‘सोनी मराठी’ या वाहिनीचे आहे. मी श्री. निखिल माने यांचे मनापासून आभार मानतो. खूप खूप प्रेम” असं म्हणत त्यांनी त्याच्या या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

Tags: maharashtrachi hasyajatramarathi actorsamir choughuleSamir Choughule Fan Moment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
bigg boss 17 : mother's reaction on vicky jain’s statement of marrying ankita lokhande is just an investment

Bigg Boss 17 : "तेव्हाच नखरे पूर्ण होतात...", अंकिता लोखंडेवर पैसे खर्च करण्यावर विकी जैनचं वादग्रस्त वक्तव्य, सासूचाही लेकाला पाठिंबा, म्हणाल्या "गुंतवणूक केल्यावरच..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.