बुधवार, जून 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

साधा लूक, नतमस्तक झाला अन्…; अबूधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिरामध्ये पोहोचला अक्षय कुमार, व्हिडीओ व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 15, 2024 | 1:01 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Akshay kumar on hindu temple

साधा लूक, नतमस्तक झाला अन्...; अबूधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिरामध्ये पोहोचला अक्षय कुमार, व्हिडीओ व्हायरल

अयोध्येमधील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना व भव्यदिव्य सोहळा अवघ्या जगभरातील लोकांच्या लक्षात राहणारा ठरला. या सोहळ्यासाठी बॉलिवूड कलाकारही अयोध्येमध्ये उपस्थित होते. आता असाच एक अभिमानास्पद क्षण भारतीयांनी बुधवारी (१४ फेब्रुवारी) साजरा केला. अबुधाबीमध्ये बनलेल्या पहिल्या हिंदूमंदिराचा उद्घाटन सोहळा अगदी थाटात पार पडला. यावेळी राजकीय मंडळींसह बॉलिवूडच्या बड्या कलाकाराने हजेली लावली. खुद्द अक्षय कुमार तिथे दर्शनासाठी पोहोचला. त्यादरम्यानचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Akshay kumar on hindu temple)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संयुक्त अरब अमिरातमध्ये उभारण्यात आलेल्या हिंदू मंदिराचे उदघाटन पार पडले. बोचासवानी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेमार्फत अबू मुरेखा या भागात हिंदू मंदिर उभारले गेले आहे. दुबईसारख्या अरब राष्ट्रांमध्ये हिंदू मंदिर उभारले गेल्याने आकर्षण निर्माण होत आहे. मंदिरामध्ये दर्शनसाठी येत असतानाचा अक्षय कुमारचा व्हिडीओ एनआय वृत्तसंस्थेमार्फत शेअर केला गेला.

आणखी वाचा – कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आईचे निधन, ‘इंडियन आयडल’मध्ये लेकाचं झालेलं कौतुक पाहून ढसाढसा रडल्या होत्या अन्…

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

या मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी अक्षय कडक सुरक्षाव्यवस्थेसह अतिशय साध्या वेषामध्ये पाहायला मिळाला. त्याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. अबुधाबीमध्ये उभारले गेलेले हिंदू मंदिर हे भगवान स्वामीनारायण यांना समर्पित केलेले आहे. स्वामीनारायण मंदिर तब्ब्ल २७ एकरमध्ये उभारलेले असून १०८ फूट उंच, ६६२ फूट लांब आणि १८० फूट रुंद आहे. मंदिराच्या उभारणीसाठी सुमारे ७०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तसेच या मंदिराच्या बांधकामासाठी संगमरवर, चुनखडी आणि १८ लाख विटांचा वापर करण्यात आला आहे. मंदिराचे बांधकाम करण्यासाठी सुमारे ७०० कंटेनरमध्ये २०,००० दगड आणण्यात आले. या मंदिराच्या बांधकामाची सुरवात २०१९मध्येच करण्यात आली होती.

आणखी वाचा – बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ‘हे’ लोकप्रिय चित्रपट आता ओटीटीवरही प्रदर्शित होण्यासाठी सज्ज, जाणून घ्या कधी व कुठे पाहता येणार?

२२ जानेवारीला आयोध्येमधील बहुचर्चित राममंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्यासाठी सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. मात्र त्याचवेळी अक्षय ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असल्याने उपस्थित राहू शकला नव्हता. स्वामीनारायण मंदिरासाठी वेळात वेळ काढून अक्षयने हजेरी लावल्याने चाहत्यांनादेखील आनंद झाला. अबुधाबीमधील स्वामीनारायण मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी शंकर महादेवन यांनीही आपली भावना व्यक्त केली. शंकर महादेवन यांनी यावर भाष्य करत, “समस्त भारतीयांसाठी आणि जगातील सर्व हिंदूंसाठी हा आनंदाचा क्षण आहे, अबुधाबीच्या धरतीवर उभारल्या गेलेल्या हिंदू मंदिरामुळे आम्ही एक ऐतिहासिक क्षण साजरा करत आहोत आणि हे केवळ पंतप्रधान मोदी यांच्या पुढाकारानेच शक्य आहे” असं म्हटलं आहे.

Tags: abudhabiakshay kumarfirst hindu templekhiladi akshay kumarpm narendra modiSwaminarayan mandirtemple inauguration
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Next Post
Aishwarya Narkar And Avinash Narkar

बायकोवर अगदी जीवापाड प्रेम करतात अविनाश नारकर, शेअर केलेल्या रोमँटिक व्हिडीओची चर्चा, चाहते म्हणाले, "तुमच्या नात्यातील खरेपणा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.