मराठी सिनेसृष्टीतील बहुतांश कलाकारांचा प्रवास हा ‘बिग बॉस’ या रिऍलिटी शोमुळे खऱ्या अर्थाने सुरु झाला. अनेक कलाकारांना या रिऍलिटी शोने सिनेसृष्टीतील त्यांचं स्थान मिळवून दिलं. असाच एक मराठमोळा अभिनेता ज्याचं ‘बिग बॉस’ या कार्यक्रमामुळे आयुष्यचं बदललं तो म्हणजे अक्षय केळकर. अक्षयने ‘बिग बॉस मराठी सिझन ४ या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून भाग घेत त्याच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. इतकंच नव्हे तर ‘बिग बॉस मराठी सिझन ४’चा तो मानकरीही ठरला. (Akshay Kelkar Post)
‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर नाव कोर्ट अक्षयने साऱ्या चाहत्यांची मनं जिंकली. यानंतर अक्षय काही थांबलाच नाही. अक्षयने ‘बिग बॉस’ची ट्रॉफी स्वतःच्या नावावर केल्यानंतर त्याच्या आयुष्यातील या आनंदाच्या दिवसाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. या त्याच्या खास दिवसाला एक वर्ष पूर्ण होताच अभिनेत्याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे की, “माझ्या आयुष्यातल्या या महत्त्वपूर्ण दिवसाला एक वर्ष पूर्ण. आयुष्यातला एक कमाल क्षण. ‘बिग बॉस’ने माझ्या घरातल्या प्रवासाचं, खिलाडू वृत्तीचं केलेलं कौतुक. एका सुंदर क्षणांनी भरलेल्या प्रवासातला विजयाचा तो शेवटचा दिवस, त्याला आज एक वर्ष पूर्ण होतं आहे. (हे खूप फिल्मी वाटू शकतं, पण एक वर्ष झालं आहे, खरंच वाटत नाही. अजूनही घरात असल्यासारखंच वाटत आहे.) मायबाप रसिकांचे मनापासून आभार. हा प्रवास तुमच्यामुळे शक्य झाला. प्रत्येकाचे आभार. तुम्ही खूप ग्रेट आहात. ‘बिग बॉस’ व मायबाप प्रेक्षक खूप प्रेम. मी खरंच फक्त व फक्त तुमचाच आहे” असं तो म्हणाला आहे.
‘बिग बॉस मराठी सिझन ४’चा विजेता ठरलेला अक्षय केळकरने ‘ढोलकीच्या तालावर’ या लोकप्रिय रिऍलिटी शोचे सूत्रसंचालन केले आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या ‘दोन कटिंग’ या शॉर्ट फिल्मने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या शॉर्ट फिल्ममधील समृद्धी केळकर व अक्षयच्या जोडीला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं.