सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मर्डर मिस्ट्री, थ्रिलर अन्…; ‘इंडियन पोलिस फोर्स’ ते ‘द लीजेंड ऑफ हनुमान’ या  वेबसीरिज प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 8, 2024 | 12:57 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Indian police force, the legend of hanuman season 3, killer soup and karma calling these 4 web series will be released on ott

मर्डर मिस्ट्री, थ्रिलर अन्...; ‘इंडियन पोलिस फोर्स’ ते ‘द लीजेंड ऑफ हनुमान’ या वेबसीरिज प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार

गेले वर्ष हे मनोरंजनाच्या दृष्टीने अनेकदृष्ट्या संपन्न होते. ओटीटीवर रहस्य, कॉमेडी, प्रेम, अ‍ॅक्शनने परिपूर्ण असलेल्या अनेक वेबसीरिज व चित्रपट पाहायला मिळाले होते. अशातच येत्या नवीन वर्षातदेखील ओटीटीवर अनेक वेबसीरिज प्रदर्शित होणार आहेत. यात रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘इंडियन पोलिस फोर्स’ या सीरिजपासून ते अगदी मनोज बाजपेयी यांच्या ‘किलर सूप’ या सीरिजचादेखील समावेश असणार आहे. जर तुम्हाला ओटीटीवर मर्डर मिस्ट्री, थ्रिलर त्याचबरोबर अ‍ॅक्शन अनुभवायची असेल तर या खास सीरिज तुमच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत.

(१) किलर सूप : मनोज बाजपेयी व कोंकणा सेन शर्मा यांची प्रमुख भूमिका असलेली क्राइम थ्रिलर वेबसिरीज ‘किलर सूप’ येत्या ११ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरीजची कथा प्रभाकर (मनोज बाजपेयी) आणि स्वाती (कोंकणा सेन शर्मा) यांची असल्याचे बोलले जात आहे. उमेश आणि स्वाती यांचे एकमेकांवर प्रेम आहे. स्वातीचे शेफ बनण्याचे स्वप्न आहे. पण एका हत्येनंतर यांचे आयुष्यच बदलून जाते. अभिषेक चौबे दिग्दर्शित ही वेबसीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

(२) कर्मा कॉलिंग : डिस्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणारी ‘कर्मा कॉलिंग’ ही वेबसीरिज ‘रिव्हेंज’ या एबीसी सीरिजचा रिमेक आहे. या वेबसीरिजमध्ये रवीना टंडन ही चकचकीत, ग्लॅमर, फसवणूक व विश्वासघाती अशा अलिबागवर राज्य करणारी इंद्राणी कोठारीची भूमिका साकारणार आहे. रुची नारायण यांनी यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले असून येत्या २६ जानेवारीला ही सीरिज प्रदर्शित होणार आहे.   

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “लग्न केलं म्हणून तुझा गुलाम नाही”, नवऱ्याकडून अंकिता लोखंडेला तुच्छ वागणूक, म्हणाला, “आजवर घेतलेला निर्णय…”

(३) द लीजेंड ऑफ हनुमान सीझन ३ : ‘द लीजेंड ऑफ हनुमान’ चा तिसरा सीझन हा येत्या १२ जानेवारी रोजी डिस्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या वेबसीरिजमध्ये रावणाच्या पात्राला मराठमोळा अभिनेता शरद केळकरचा आवाज लाभला आहे. या मालिकेच्या कथेबद्दल सांगायचे तर, या मालिकेची कथा पौराणिक वानरसेना व भगवान हनुमान यांच्याभोवती फिरते.  

आणखी वाचा – बच्चन कुटुंबियांमध्ये वाद सुरु असताना सून-लेकासह धमाल करताना दिसले अमिताभ, पण जया बच्चन यांनी येणं टाळलं, फोटो व्हायरल

(४) इंडियन पोलिस फोर्स : रोहित शेट्टी व सुशांत प्रकाश दिग्दर्शित ‘इंडियन पोलिस फोर्स’ ही सीरिज येत्या १९ जानेवारी २०२४ रोजी अ‍ॅमेझोन या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या अ‍ॅक्शन थ्रिलर वेबसीरिजची कथा भारतीय पोलिस अधिकाऱ्यांभोवती फिरणारी आहे. अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर येणाऱ्या या वेबसीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी व विवेक ओबेरॉय हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय या मालिकेत श्वेता तिवारी, निकितिन धीर, ऋतुराज सिंग, मुकेश ऋषी व ललित परिमू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Tags: Bollywood entertainmententertainment newsindian police forcekarma callingkiller soupottott newsott webseriesthe legend of hanuman season 3
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Vandana Gupte On Natyasanmelan

"नटून थटून आले पण…", नाट्यसंमेलनाचा पत्ता सापडला नाही म्हणून वंदना गुप्ते यांचा संताप, म्हणाल्या, "मी आता परत…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.