Nupur Shikhare and Ira Khan Marriage : बॉलिवूड सिनेसृष्टीत आयरा खान व नुपूर शिखरे यांच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. अखेर आज ८ जानेवारी रोजी या जोडीचा शाही रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे. राजस्थान येथील उदयपूरमधील आलिशान हॉटेलमध्ये आयरा व नुपूर लग्नबंधनात अडकणार आहेत. उदयपूरच्या ताज लेक पॅलेस येथे त्यांचा शाही रिसेप्शन सोहळा पार पडणार असल्याचं समोर आलं आहे. आयराच्या लग्नासाठी तिचे कुटुंबीय व मित्र परिवार उदयपूरला रवाना झाले आहेत.
आयराने तिच्या लग्नसाठी उदयपूरला रवाना होतानाचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून पोस्ट केला आहे. आयराने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिचं लग्नासाठीच भव्यदिव्य असं पॅलेस पाहायला मिळत आहे. उदयपूरच्या या पॅलेसमध्ये जाण्यासाठी त्यांनी बोटचा वापर केला. त्यानंतर तिथे पोहोचल्यावर अभिनेत्री व तिचे मित्र-मैत्रिणी राजस्थानी संगीतावर थिरकरताना दिसले. आयरासह नुपूरही राजस्थानी संगीतावर ठेका धरताना दिसला.
आयराने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ मेनन, मिथिला पालकर पाहायला मिळत आहे. नववधूसह तिचे मित्र मैत्रिणी थिरकताना दिसले. सूर्योदयाच्या साक्षीत असलेलं हे भव्य पॅलेस आयरा व नूपुरच्या लग्नासाठी सज्ज झालं आहे. डिनर लाईट जेवण, संगीताची मैफिल असलेल्या या शाही थाटामाटात आमिर खानच्या लेकीचा लग्नसोहळा उरकणार आहे. पांढरं शुभ्र असं आलिशान हॉटेल पाहून साऱ्यांच्या नजरा या हॉटेलच्या आवाराकडे वळल्या आहेत. लेकीच्या लग्नासाठी आलेल्या आमिर खानचंही जंगी स्वागत होताना व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं.
बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर आमिर खानची मुलगी आयरा खान तिचा प्रियकर नुपूर शिखरे याच्यासह विवाह बंधनात अडकली. ३ जानेवारीला आयरा व नुपूर यांनी नोंदणी पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा उरकला. मुंबईतील ताज एंड या आलिशान हॉटेलमध्ये त्यांचा हा सोहळा बॉलिवूड दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला. आयरा व नुपूर यांच्या लग्नापुर्वीच्या विधींनीही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.