शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

टीव्ही इंडस्ट्रीतून अभिनेत्रीला काम मिळणं बंद झालं आणि…; सध्या सुप्रसिद्ध अभिनेत्री सोडवतेय नागरिकांचे प्रश्न, करत आहे ‘हे’ काम

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 25, 2024 | 5:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aishwarya Sakhuja Left Tv Industry

असे अनेक टीव्ही कलाकार आहेत ज्यांना अचानकपणे सिनेसृष्टीतून चांगल्या ऑफर्स येणे बंद झाले तेव्हा त्यांना इंडस्ट्रीला राम राम करावा लागला. अशावेळी या कलाकारांपैकी अनेकांनी घरी बसून न राहता दुसरा व्यवसाय स्वीकारला. अशीच एक सुप्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री जिने सिनेइंडस्ट्री सोडली आणि आता ती प्रेक्षकांच्या समस्या सोडवत आहे. ही अभिनेत्री म्हणजे दुसरी कोणी नसून ऐश्वर्या सखुजा आहे. आज ऐश्वर्याने टीव्ही इंडस्ट्रीपासून दूर असून तिने दुसरा व्यवसाय स्वीकारला आहे. ऐश्वर्या सखुजाने अक्षय कुमार व विद्या बालन यांच्या ‘भूल भुलैया’ या चित्रपटातून बॅकग्राउंड डान्सर म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर ती टेलिव्हिजन शो ‘हॅलो कौन’मध्ये दिसली? ‘पहचान कौन’, ‘लिफ्ट करा दो’ मध्ये होस्ट म्हणून दिसली. मात्र, तिने ‘रिश्ता डॉट कॉम’ या शोमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. (Aishwarya Sakhuja Left Tv Industry)

यानंतर ऐश्वर्या सखुजाला ‘सास बिना ससुराल’ या मालिकेमध्ये मुख्य भूमिका मिळाली. या मालिकेत तिने रवी दुबे व मेघन जाधव यांच्याबरोबर तान्या शर्मा उर्फ ​​टोस्टीची भूमिका साकारली होती. ही मालिका बरीच गाजली आणि या मालिकेतील भूमिकेमुळे ऐश्वर्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. यानंतर तिने ‘ये है आशिकी’, ‘त्रिदेवियां’, ‘साराभाई व्हर्सेस साराभाई: टेक २’, ‘ये है चाहतां’ आणि ‘मैं ना भूलंगी’ यांसारख्या अनेक शोमध्ये काम केले. तिने ‘नच बलिए ७’ आणि ‘फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी ७’सारख्या अनेक रिॲलिटी टेलिव्हिजन शोमध्ये भाग घेतला.

आणखी वाचा – “मामा-भाच्याच्या भांडणात…”, गोविंदा व कृष्णा अभिषेक यांच्या भांडणावर आरती सिंहचं वक्तव्य, म्हणाली, “कधीच संवाद…”

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Sakhuja Nag (@ash4sak)

तथापि, अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की, तिच्याकडे दीड वर्षांपासून कोणतेही काम नव्हते आणि तिला इंडस्ट्रीला याचा दोष द्यायचा नव्हता. तिने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला सांगितले की, “अभिनेते फ्रीलांसर आहेत आणि जर आपण एखाद्या गोष्टीला नाही म्हटलं तर दोन प्रोजेक्ट्समधला कालावधी किती असेल हे आम्हाला माहीत नाही. मी या अडचणीत सापडले होते. मला कॉल्सही येणे बंद झाले होते. हा माझ्यासाठी पूर्णपणे कोरडा टप्पा होता. माझं काय चुकतंय ते मला कळत नव्हतं. दररोज उठणे कठीण होते कारण मला उद्देशाची जाणीव नव्हती”. या टप्प्यातून बाहेर येण्यासाठी तिला काय आवश्यक आहे हे तिच्या पतीला समजले, ऐश्वर्या म्हणाली, “त्याने मला मानसिकदृष्ट्या खचताना पाहिले आहे आणि मला एका थेरपिस्टशी बोलण्यास सांगितले, ज्याने मला हा कोर्स (थेरपिस्ट होण्यासाठी) सुचवलं. त्याने मला हे सुचवले. मला वाटले की, मी यात चांगले यास मिळवू शकेन. मनात शंका असताना, नागने मला कोर्स करण्यासाठी प्रेरित केले आणि पाच दिवसांच्या कार्यशाळेने याची सुरुवात केली”.

आणखी वाचा – मातृत्वावर शबाना आझमी स्पष्टच बोलल्या, मूल नसण्याबाबतही केलं भाष्य, म्हणाल्या, “मूल दत्तक…”

बरं, आता ऐश्वर्या सखुजा एक प्रमाणित थेरपिस्ट आहे. तिने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला याचा खुलासा केला आणि म्हणाली, “मी गेल्या दोन वर्षांपासून थेरपीचा अभ्यास करत आहे आणि आता एक थेरपिस्ट म्हणून काम करत आहे. मी ग्राहकांना मार्गदर्शन करत आहे. मला गेल्या महिन्यात जूनमध्ये माझे प्रमाणपत्र मिळाले आहे. ही चित्रे माझ्या वर्गातील आहेत कारण मी रीग्रेशनसाठी कार्यशाळा घेते. मी आता थेरपी या विषयातील ट्रेनर आहे”.

Tags: aishwarya sakhujaAishwarya Sakhuja Left Tv IndustryAishwarya Sakhuja serialentertainmenttv actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Marathi actress Hemangi Kavi shared an appreciative post for Chhaya Kadam.

“तुझं भारीपण लक्षात यायला उशीर झाला”, छाया कदम यांच्यासाठी प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “अभिनयाच्या यशाबरोबरच…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.