असे अनेक टीव्ही कलाकार आहेत ज्यांना अचानकपणे सिनेसृष्टीतून चांगल्या ऑफर्स येणे बंद झाले तेव्हा त्यांना इंडस्ट्रीला राम राम करावा लागला. अशावेळी या कलाकारांपैकी अनेकांनी घरी बसून न राहता दुसरा व्यवसाय स्वीकारला. अशीच एक सुप्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री जिने सिनेइंडस्ट्री सोडली आणि आता ती प्रेक्षकांच्या समस्या सोडवत आहे. ही अभिनेत्री म्हणजे दुसरी कोणी नसून ऐश्वर्या सखुजा आहे. आज ऐश्वर्याने टीव्ही इंडस्ट्रीपासून दूर असून तिने दुसरा व्यवसाय स्वीकारला आहे. ऐश्वर्या सखुजाने अक्षय कुमार व विद्या बालन यांच्या ‘भूल भुलैया’ या चित्रपटातून बॅकग्राउंड डान्सर म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर ती टेलिव्हिजन शो ‘हॅलो कौन’मध्ये दिसली? ‘पहचान कौन’, ‘लिफ्ट करा दो’ मध्ये होस्ट म्हणून दिसली. मात्र, तिने ‘रिश्ता डॉट कॉम’ या शोमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. (Aishwarya Sakhuja Left Tv Industry)
यानंतर ऐश्वर्या सखुजाला ‘सास बिना ससुराल’ या मालिकेमध्ये मुख्य भूमिका मिळाली. या मालिकेत तिने रवी दुबे व मेघन जाधव यांच्याबरोबर तान्या शर्मा उर्फ टोस्टीची भूमिका साकारली होती. ही मालिका बरीच गाजली आणि या मालिकेतील भूमिकेमुळे ऐश्वर्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. यानंतर तिने ‘ये है आशिकी’, ‘त्रिदेवियां’, ‘साराभाई व्हर्सेस साराभाई: टेक २’, ‘ये है चाहतां’ आणि ‘मैं ना भूलंगी’ यांसारख्या अनेक शोमध्ये काम केले. तिने ‘नच बलिए ७’ आणि ‘फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी ७’सारख्या अनेक रिॲलिटी टेलिव्हिजन शोमध्ये भाग घेतला.
तथापि, अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की, तिच्याकडे दीड वर्षांपासून कोणतेही काम नव्हते आणि तिला इंडस्ट्रीला याचा दोष द्यायचा नव्हता. तिने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला सांगितले की, “अभिनेते फ्रीलांसर आहेत आणि जर आपण एखाद्या गोष्टीला नाही म्हटलं तर दोन प्रोजेक्ट्समधला कालावधी किती असेल हे आम्हाला माहीत नाही. मी या अडचणीत सापडले होते. मला कॉल्सही येणे बंद झाले होते. हा माझ्यासाठी पूर्णपणे कोरडा टप्पा होता. माझं काय चुकतंय ते मला कळत नव्हतं. दररोज उठणे कठीण होते कारण मला उद्देशाची जाणीव नव्हती”. या टप्प्यातून बाहेर येण्यासाठी तिला काय आवश्यक आहे हे तिच्या पतीला समजले, ऐश्वर्या म्हणाली, “त्याने मला मानसिकदृष्ट्या खचताना पाहिले आहे आणि मला एका थेरपिस्टशी बोलण्यास सांगितले, ज्याने मला हा कोर्स (थेरपिस्ट होण्यासाठी) सुचवलं. त्याने मला हे सुचवले. मला वाटले की, मी यात चांगले यास मिळवू शकेन. मनात शंका असताना, नागने मला कोर्स करण्यासाठी प्रेरित केले आणि पाच दिवसांच्या कार्यशाळेने याची सुरुवात केली”.
बरं, आता ऐश्वर्या सखुजा एक प्रमाणित थेरपिस्ट आहे. तिने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला याचा खुलासा केला आणि म्हणाली, “मी गेल्या दोन वर्षांपासून थेरपीचा अभ्यास करत आहे आणि आता एक थेरपिस्ट म्हणून काम करत आहे. मी ग्राहकांना मार्गदर्शन करत आहे. मला गेल्या महिन्यात जूनमध्ये माझे प्रमाणपत्र मिळाले आहे. ही चित्रे माझ्या वर्गातील आहेत कारण मी रीग्रेशनसाठी कार्यशाळा घेते. मी आता थेरपी या विषयातील ट्रेनर आहे”.