ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी व जावेद अख्तर यांचा विवाह १९८४ साली झाला होता. बॉलिवूडमधील आदर्श जोडी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ते एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि त्यांचा आदर करतात. जावेदची मुले फरहान व झोया यांच्याशीही शबानाचे चांगले संबंध आहेत. अभिनेत्रीने याआधी एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला अपत्य नसल्यामुळे ती निराश होईल अशी अपेक्षा होती, परंतु तिला मुले होऊ शकत नाहीत हे तिने सहजतेने मान्य केले. जेव्हा शबाना आझमी यांना २००० मध्ये एका मुलाखतीदरम्यान सिमी ग्रेवाल यांनी काम करणाऱ्या स्वावलंबी स्त्री’साठी लग्नाचे महत्त्व विचारले तेव्हा तिने सांगितले की, तिची केस वेगळी आहे, कारण तिला मुले नव्हती. ती म्हणाली, मुलं न होऊ शकल्याने माझ्यासाठी काही चॉइसेस खूप सोप्या झाल्या, कारण मी माझा जास्त वेळ कामासाठी देऊ शकले. माझ्यामते, मातृत्वात स्त्रीचा खूप कस लागतो”. (Shabana Azmi Statement)
ही मोठी निराशा आहे का, असे विचारले असता शबाना म्हणाली, “नाही. खरं तर मलाही हे पाहून आश्चर्य वाटलं होतं, कारण सुरुवातीला मला विश्वासच बसत नव्हता की मी आई होणार नाही. मला खात्री होती की मी इतकी खास आहे की हा देवाने मला दिलेला अधिकार आहे. पण तरीही बाळ होणार नाही हे मी किती सहजपणे स्वीकारले हे पाहून मला आश्चर्य वाटलं. जेव्हा मला समजलं की आपल्याला मुलं होऊ शकत नाहीत, त्यामुळे मी त्याचा फार विचार करुन स्वतःला त्या गोष्टीसाठी दुःखी होऊ दिलं नाही. मी त्या टप्प्यातून पुढे जायचं ठरवलं कारण मी करु शकलेल्या इतर अनेक गोष्टींसाठी मी खूप आभारी होते”.
शबानाला विचारण्यात आले की, तिने कधी मूल दत्तक घेण्याचा विचार केला आहे का आणि ती लगेच म्हणाली, “मला कधीही मूल दत्तक घ्यायचे नव्हते. जावेदच्या मुलांशी माझी मैत्री आहे, त्यामुळे मुलांच्या गरजा पूर्ण झाल्या. ते अशा वयात आहेत जेव्हा मला त्यांची लंगोट बदलण्याची काळजी करण्याची गरज नाही. फरहान व झोयानेही तिच्या आणि जावेदच्या लग्नाला विरोध केला नाही, कारण त्यावेळी ते खूप लहान होते”.
जावेद अख्तरने हनी इराणीशी लग्न केले आणि त्यांना फरहान व झोया ही दोन मुले आहेत. यानंतर जावेदने शबाना आझमीशी लग्न केले. शबानाबद्दल सांगायचे तर, ७०च्या दशकात तिचे नाव बेंजामिन गिलानीशी जोडले गेले होते, परंतु नंतर तिने जावेदशी लग्न केले. शबानाच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता, मात्र त्यांनी कोणाचेही ऐकले नाही.