शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मामा-भाच्याच्या भांडणात…”, गोविंदा व कृष्णा अभिषेक यांच्या भांडणावर आरती सिंहचं वक्तव्य, म्हणाली, “कधीच संवाद…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 25, 2024 | 3:28 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aarti Singh said that she never got involved in the fight between Krushna Abhishek and Govinda

“मामा-भाच्याच्या भांडणात...”, गोविंदा व कृष्णा अभिषेक यांच्या भांडणावर आरती सिंहचं वक्तव्य, म्हणाली, "कधीच संवाद…”

प्रसिद्ध कॉमेडियन, अभिनेता कृष्णा अभिषेक हा लोकप्रिय सेलिब्रिटी म्हणून ओळखला जातो. तो अभिनेता गोविंदाचा भाचा आहे. त्यामुळे अनेकदा त्याच्यावर घराणेशाहीचे आरोप देखील केले जातात. परंतु गोविंदा आणि कृष्णामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मतभेद सुरु आहेत. हे मतभेद इतक्या टोक्याचे आहेत की गेल्या काही वर्षांपासून दोघं एकमेंकासमोरही आलेले नाहीत. अलीकडेच, कृष्णा अभिषेकची बहीण आणि टीव्ही अभिनेत्री आरती सिंहने भाऊ आणि मामाच्या भांडणावर उघडपणे बोलले आहे.

बॉलीवूडचा सुपरस्टार गोविंदा तिच्या लग्नाला आल्याबद्दल आरती सिंगने पहिल्यांदा आनंद व्यक्त केला. आरतीने खुलासा केला की, भाऊ आणि मामाच्या भांडणात ती कधीच सामील झाली नाही. गोविंदा तिच्यावर खूप प्रेम करतो आणि नेहमीच तिची काळजी घेतो. याबद्दल अभिनेत्री म्हणाली की, “माझ्या लग्नात माझे काका आले याचा मला सर्वाधिक आनंद झाला. थोड्या वेळासाथी आला होता. पण तो आला. त्याचे येणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. कारण खूप दिवसांनी आम्ही सगळे एकत्र भेटलो होतो”.

View this post on Instagram

A post shared by Arti singh sharma (@artisingh5)

आणखी वाचा – “मला ट्रॉफी नको पण…” ‘बिग बॉस’च्या घरातील ‘या’ स्पर्धकाची अनोखी मागणी, म्हणाला, “ट्रॉफीचं लोणचं…”

आरतीने पारस छाबराच्या पॉडकास्टमध्ये याचा खुलासा केला. तेव्हा  तिने सांगितले की, “माझ्या मामाला पाहताच मला खूप आनंद झाला. माझा त्याच्याशी कधीच संवाद झाला नाही. मी त्याच्यावर खूप प्रेम करते आणि मी नेहमी सर्वांना सांगतो की, त्यांनी माझी खूप काळजी घेतली आहे. त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले आहे. मी कधीही त्यांच्या भांडणात सहभागी झाली नाही. त्यांच्या भांडणात मी कधीच भाग घेतला नव्हता. पण तो लग्नाला आला याचा मला आनंद आहे”.

आणखी वाचा – Video : साचलेल्या पाण्यातून वाट काढताना प्रसिद्ध दिग्दर्शकाची दमछाक, व्हिडीओद्वारे दाखवली परिस्थिती, म्हणाला, “गाडीची होडी आणि…”

दरम्यान, आपल्या विनोदाचं टायमिंग, अभिनय या सगळ्यामुळेच कृष्णाने प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली आहे. व्यावसायिक जीवनात भरभरून यश मिळवलेल्या कृष्णाचं खासगी आयुष्य मात्र वाद- विवादांनीच भरलेलं आहे. कृष्णा हा अभिनेता गोविंदाचा भाचा असून मामा-भाच्याचा वाद कोणापासूनही लपलेला नाही. तेव्हापासून काका-पुतण्यामध्ये खटके उडाले असून दोन्ही कलाकार एकमेकांशी बोलत नाहीत.

Tags: Aarti SinghBollywood entertainment newsGovinda Bollywood ActorKrishna Abhishek
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Marathi singer Mangesh Borgaonkar expressed his anger about potholes on the highway through a video.

महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य, खड्डयांमुळे गाडी चालवणेही झालं कठीण, प्रसिद्ध गायकाने व्हिडीओद्वारे व्यक्त केला संताप, म्हणाला, “आपण फक्त टॅक्स...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.