सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दारूच्या नशेमध्ये मारहाण, घरी यायचा अन्…; सलमान खानने ऐश्वर्या रायची केली होती अशी अवस्था कारण…

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
नोव्हेंबर 1, 2023 | 2:55 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Aishwarya Rai and Salman Khan Breakup

दारूच्या नशेमध्ये मारहाण, घरी यायचा अन्...; सलमान खानने ऐश्वर्या रायची केली होती अशी अवस्था कारण...

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. लांबसडक केस, घारे डोळे आणि सुंदर अशा स्मितहास्याचे चाहते दिवाने आहे. मॉडेलिंगमधून आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या ऐश्वर्याने १९९४ मध्ये मिस वर्ल्डचा किताब पटकावला. त्यानंतर तिने बॉलिवूडसह अनेक दाक्षिणात्य व हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. त्यामुळेच जगभरात तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. जशी ती तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते, तशीच ती तिच्या खासगी आयुष्यामुळे बऱ्याचदा चर्चेत राहते. ऐश्वर्याने २००७ मध्ये अभिषेक बच्चनशी लग्न केलं. मात्र, त्याआधी तिचं नाव अनेक अभिनेत्याशी जोडलं गेलं होतं. त्यापैकी तिचं आणि सलमान खानबरोबरचं अफेअर खूपच चर्चेत आलं होतं. (Aishwarya Rai and Salman Khan Breakup)

९०च्या दशकात ऐश्वर्या आणि सलमानच्या अफेअरची बरीच चर्चा रंगात होती. अनेकदा हे दोघे विविध ठिकाणी एकत्र स्पॉट झालेले दिसले होते. त्यानंतर ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या सेटवर या दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघांमध्ये सर्वकाही सुरळीत असताना अचानक त्यांनी एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला. मात्र, ब्रेकअपनंतर तो तिच्याशी गैरवर्तन करू लागला. २००१ मध्ये सलमानने तिचे घर गाठत तिथल्या वस्तूंची तोडफोड केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. तसेच त्यावेळी असंही म्हटलं जात होतं की सलमानने ऐश्वर्याला लग्नाची मागणी घातली होती, पण ती इतक्यात लग्न करण्यासाठी राजी नव्हती. अखेर सलमानच्या या त्रासाला कंटाळून तिने त्याच्याबरोबरचं नातं तोडलं.

हे देखील वाचा – बड्या बॉलिवूड अभिनेत्याबरोबर स्पृहा जोशी करणार काम, चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष, कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव

दरम्यान, अभिनेत्रीने काही वर्षांपूर्वी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली होती. ज्यात तिने सलमानबरोबरच्या नात्यावर भाष्य करताना म्हणाली होती की, “ब्रेकअपनंतर सलमान मला फोन करुन त्रास द्यायचा. त्याला माझं सहकलाकाराशी अफेअर असल्याचा संशय आला होता. शाहरुख खानपासून ते अभिषेकपर्यंत त्याने माझं नाव जोडलं होतं. अनेकदा तो दारूच्या नशेत येऊन मला मारहाण करायचा. जर मी कधी त्याचा फोन उचलला नाही, तर तो स्वत:ला इजा करुन घ्यायचा. या घटनेनंतर त्याने मला इतका त्रास दिला होता, की मला यामुळे अनेक दुःख भोगावे लागले होते. त्यामुळे मी त्यांच्याबरोबरचे सर्व संबंध संपवले.”

हे देखील वाचा – १५ वर्षांचा संसार, मतभेद अन्…; सुप्रसिद्ध मराठी अभिनेते किरण करमरकरांचा घटस्फोट का झाला?, ‘बिग बॉस’च्या घरात आहे पूर्वाश्रमीची पत्नी

सलमानबरोबरच्या ब्रेकअपनंतर अभिनेत्रीचं नाव विवेक ओबेरॉयशी जोडलं होतं. मात्र हे नातं काही काळ टिकलं. आणि २००७ मध्ये ती अभिषेक बच्चनबरोबर विवाहबंधनात अडकली. दोघांना आज ‘आराध्या’ नावाची मुलगी आहे.

Tags: Aishwarya Rai and Salman Khan BreakupAishwarya Rai Bachchanbollywood newssalman khan
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Prabhakar more share a video of him wife bday celebration

Video : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरेंनी असा साजरा केला बायकोचा वाढदिवस, व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.