शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“अविनाशच चांगला डान्स करतात आणि…”, ऐश्वर्या नारकरांनी या वयातही रिल बनवण्यामागचं सांगितलं कारण, म्हणाल्या, “नवरा-बायकोचं नातं…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 2, 2024 | 12:27 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Aishwarya Narkar shared the reason behind her making reel videos with Avinash

"अविनाशच चांगला डान्स करतात आणि...", ऐश्वर्या नारकरांनी या वयातही रिल बनवण्यामागचं सांगितलं कारण, म्हणाल्या, "नवरा-बायकोचं नातं..."

सध्या करमणुकीसाठी इन्स्टाग्रामवरील रील्स व्हिडीओ पाहण्याकडे सर्वांचाच कल वाढला आहे. लॉकडाउनच्या नंतर सोशल मीडिया वापरण्यावर अधिक भर दिलं गेला आहे. त्यामुळे आता सोशल मीडिया वापरण्याचे जणू व्यसनचं लागलं आहे. यात लहान मुलांपासून ते तरुण, वयोवृद्धदेखील रील्स पाहण्यात व्यस्त आहेत. झोपताना-जागताना, खात-पिण्यात, प्रवासात, सगळीकडे रिल्सचा हँगओव्हर दिसून येतो. त्यामुळे मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार मंडळीदेखील रील्स व्हिडीओद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.

मराठी मनोरंजन सृष्टीतील असे अनेक कलाकार मंडळी आहेत, जी सोशल मीडियावर अनेक ट्रेंडिंग रील व्हिडीओद्वारे चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. अशा अनेक कलाकारांपैकी एव्हरग्रीन कलाकार म्हणजे अभिनेते अविनाश नारकर व अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. अविनाश व ऐश्वर्या नारकर हे दोघे त्यांच्या अभिनयाबरोबरच अनेक मजेशीर व डान्स रील्स व्हिडीओमुळे कायमच चर्चेत असतात. त्यांच्या याच रील्स व्हिडीओ बनवण्यामागच्या विचाराबद्दल ऐश्वर्या नारकर यांनी सांगितले आहे.

आणखी वाचा – “नशेत त्याला कसंही मारतात, इजा करतात अन्…”, जोगेश्वरीमधील कुत्र्याचे हाल पाहून भाऊ कदमांची लेक संतापली, म्हणाली, “त्याची रोजची फरपट…”

नुकतंच ‘इट्स मज्जा’बरोबर साधलेल्या संवादात ऐश्वर्या नारकर यांनी असं म्हटलं की, “बऱ्याचदा आम्ही एखाद्या गाण्याच्या मुख्य स्टेप्स असतात त्या आम्ही फॉलो करतो. पण मला फार नाचता येत नाही पण अविनाश बऱ्यापैकी चांगला डान्स करतात. त्यामुळे एखादी डान्स स्टेप करताना ती मला काशी सहज करता येईल त्यादृष्टीने आम्ही तो डान्स बसवतो आणि काहीवेळा आम्ही एखादं कंटेन्ट स्वत: बनवतो. नवरा-बायकोचे संबंध, नवरा-बायकोचे नाते, नवरा-बायकोची मैत्री ही कशी असायला पाहिजे यादृष्टीने मी काही वेगवेगळ्या पोस्ट टाकल्या होत्या.”

आणखी वाचा – Video : गेट वे ऑफ इंडियाला बोट बूक केली, समुद्रात सेलिब्रेशन अन्…; अमृता खानविलकरने नवऱ्याला दिलं सरप्राइज, रोमँटिक व्हिडीओ समोर

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “आमच्या लग्नाला आता जवळपास तीस वर्षे पूर्ण होतील. तर त्या नात्यातला आनंद कसा टिकवता येईल? यादृष्टीने मी बऱ्याचदा पोस्ट शेअर करते. मला असं वाटतं की, आपल्याला सगळ्या बाजूने सोशल मीडियाचा वापर करता आला पाहिजे. फक्त मनोरंजन किंवा टाईमपास करण्यापेक्षा आपल्याला आपल्या आयुष्याबाबतीत लोकांपर्यंत काय पोहोचवता येईल यादृष्टीने आम्ही सोशल मीडियावर कंटेन्ट बनवत असतो”.

Tags: aishwarya narkaravinash narkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Pooja Singh and Karan Sharma Wedding

'दीया और बाती हम' सुप्रसिद्ध अभिनेत्रीने 'या' अभिनेत्यासह बांधली लग्नगाठ, लग्नाच्या मंडपातील फोटो समोर, चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.