‘दिया और बाती हम’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्रीने चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली आहे. या मालिकेतील अभिनेत्री पूजा सिंहचा नुकताच शाही विवाहसोहळा संपन्न झाला आहे. अभिनेत्रीने ‘ससुराल सिमर का २’ मालिकेतील अभिनेत्याशी लग्नगाठ बांधली आहे. पूजाने करण शर्माबरोबर सात फेरे घेतले आहेत. पूजा व करणच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. ‘दिया और बाती हम’मध्ये पूजा सिंह इमली राठौरच्या भूमिकेत दिसली होती. पूजा सिंह व करण शर्मा यांचा विवाह ३० मार्च रोजी अगदी थाटामाटात पार पडला. (Pooja Singh and Karan Sharma Wedding)
पूजा-करणच्या लग्नाला टेलिव्हिजन विश्वातील कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. अशातच त्यांच्या लग्नातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नवऱ्यामुलीची रॉयल एंट्री पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये वरमाला घालेपर्यंतचे विधीही पहायला मिळत आहेत. वरमाला घातल्यानंतर दोघांनीही एकमेकांना मिठी मारताना आणि किस करताना दिसले. ‘ससुराल सिमर का २’, ‘दिया और बाती हम’ आणि ‘तेरे इश्क में घायाल’ या मालिकेतील सर्व कलाकार त्यांच्या लग्नाला उपस्थित होते. पूजा व करणच्या लग्नाचे विधी २९ मार्चपासून सुरु झाले. पूजाच्या मेहंदीसोहळ्याची विशेष चर्चा रंगली. कारण अभिनेत्रीच्या हातावर नवऱ्यामुलाच्या चेहऱ्याची मेहंदी काढण्यात आली होती. यानंतर त्यांचा हळदी व संगीताचा कार्यक्रम ही आटोपला. ‘दिया और बाती हम’मध्ये भाभोची भूमिका साकारणाऱ्या नीलू वाघेलाने पूजाच्या संगीत सोहळ्यात दमदार परफॉर्मन्स दिला.
पूजा व करण यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगायचे झाले तर, दोघेही कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून भेटले होते. पूजा सिंहने ‘पिंकविला’ला सांगितले होते की, हा एक प्रकारचा अरेंज्ड मॅरेज सेटअप होता. करण व पूजा यांनी एकाच प्रॉडक्शन हाऊसमध्ये अनेक वर्षे काम केले. अनेक वर्ष एकत्र काम करुनही त्यांचे एकमेकांशी कधीही भांडण झाले नाही. पूजाने सांगितले होते की, ती आणि करण एकाच स्टुडिओत शूटिंग करायचे, पण कधीच भेटले नाही. कोविड महामारीच्या काळातही, करणची मालिका आणि तिच्या मालिकेतील संपूर्ण कलाकार एकाच हॉटेलमध्ये थांबले होते, त्यावेळीही एकत्र असताना त्यांच्यात संघर्ष झाला नाही.
पूजा सिंहचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी तिने बॉयफ्रेंड कपिल चटनानीबरोबर लग्न केले होते. हे लग्न २०१७ मध्ये झाले. परंतु २०२१ मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.आता आयुष्यात पुन्हा नव्याने सुरुवात केल्याने पूजा खूपच खूश आहे.