मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल बद्दल जाणून घ्यायला चाहते नेहमीच उत्सुक असतात. बरं या कलाकारांच्या वयात मोठं अंतर असूनही ही कलाकार मंडळी सुखाचा संसार करताना दिसतात. संसार, प्रेम करताना वयाच बंधन नसत हे बोललं जात ते अगदी अचूक आहे. अशाच मराठी मनोरंजन विश्वातील वयात अंतर असूनही आपल्या जोडीदाराला सांभाळून घेणाऱ्या कलाकारांबद्दल जाणून घेऊयात.
लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ ७५ वर्षाचे आहेत तर अभिनेत्री निवेदिता सराफ या ६० वर्षांच्या आहेत. त्या दोघांमध्ये जवळपास १५ ते १६ वर्षाचं अंतर आहे.
सोनाली खरे आणि बिजय आनंद यांच्यात १५ वर्षांचं अंतर आहे. सध्या सोनाली ही ३८ वर्षाची आहे तर बिजय ५३ वर्षाचे आहेत.(Celebrity Couple Age)
लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरी आता ५० वर्षाचा आहे तर दीपा ४१ वर्षाची आहे. दीपा आणि अंकुश यांच्यात ९ वर्षाचं अंतर आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी म्हणजे राणादा आणि पाठकबाई. हार्दिक आणि अक्षयच्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली होती.या दोघांमध्ये तब्बल ६ वर्षाचं अंतर आहे. अक्षया २८ वर्षांची आहे तर हार्दिक ३४ वर्षाचा आहे.
हे देखील वाचा – टीआरपीच्या शर्यतीत स्टार प्रवाहने मारली बाजी
प्रिया बापट आणि उमेश कामत हे देखील क्युट कपल पैकी एक आहेत. प्रियाच वय हे ३६ वर्ष आहे तर उमेश ४४ वर्षाचा आहे. प्रिया आणि उमेश यांच्यात तब्बल ८ वर्षाचं अंतर आहे.(Celebrity Couple Age)
अभिनेता रितेश आणि जिनिलिया हे महाराष्ट्र्राचे लाडके दादा वाहिनी आहेत. ही जोडी लोकप्रिय जोडींपैकी असून या जोडीमध्ये १० वर्षाचं अंतर आहे. जिनिलिया आता ३५ वर्षाची आहे तर रितेश ४५ वर्षाचा आहे.