बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 Grand Finale : मुनव्वर फारुकीने आयेशा खानला लगावला टोला, घरातून बाहेर येताच केलं भाष्य, म्हणाला, “लोकांना महत्त्व…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 29, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
After winning Bigg Boss 17, Munawar Faruqui talk about Ayesha Khan see the details

मुनव्वर फारुकीने आयेशा खानला लगावला टोला, घरातून बाहेर येताच केलं भाष्य, म्हणाला, “लोकांना महत्त्व...”

Bigg Boss Season 17 Grand Finale Updates : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस १७’चा महाअंतिम सोहळा काल (२८ जानेवारी) रोजी पार पडला. ‘बिग बॉस’च्या यंदाच्या १७वया पर्वात प्रसिद्ध कॉमेडियन व अभिनेता मुनव्वर फारुकीने विजेतेपद पटकावले. ‘बिग बॉस’च्या घरात येण्यापूर्वी  मुनव्वरची लोकप्रियता ही खूपच होती. पण ‘बिग बॉस’च्या प्रवेशानंतर त्याच्या लोकप्रियतेत आणखीनच वाढ झाली. या शोमध्ये तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चांगलाच चर्चेत आला. या घरात वाईल्ड कार्ड म्हणून आलेली स्पर्धक आयेशा खानने मुनव्वरवर अनेक गंभीर आरोप केले होते.

अशातच ‘बिग बॉस १७’चा विजेता झाल्यानंतर मुनव्वरने आयेशाबद्दल भाष्य केलं आहे. ‘इन्स्टंट बॉलिवूड ’ला दिलेल्या मुलाखतीत मुनव्वरला “शो संपल्यानंतर तो आयशाच्या संपर्कात राहिल का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर मुनव्वर उत्तर देत असं म्हणाला की, “मी तिच्या संपर्कात राहीन असं मला वाटत नाही. मी खूप गोष्टी सोडून देतो, पण कधी कधी काही गोष्टी योग्य रितीने संपवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. त्याच गोष्टी मी ‘बिग बॉस’च्या प्रवासातून शिकलो आहे.”

View this post on Instagram

A post shared by Munawar Faruqui (@munawar.faruqui)

आणखी वाचा – “माफी मागावी अन्यथा आंदोलन अटळ!”, जात विचारण्यावरुन पुष्कर जोगने केलेल्या पोस्टवर BMC चे अधिकारी संतापले, म्हणाले…

यापुढे त्याने असं म्हटलं की, “मी आता माझ्या नात्यांमध्ये जास्त स्पष्टता आणण्याचा प्रयत्न करणार आहे. आयुष्यात त्याच लोकांना महत्त्व द्या, ज्यांच्या आयुष्यात तुम्हाला महत्त्व आहे, हेच मी शिकलो आहे आणि त्यावर मी माझ्या पुढील आयुष्यात काम करेन.”

आणखी वाचा – मुग्धा करतेय प्रथमेशचे लाड, नवऱ्याच्या उपवासादिवशी बनवला खास पदार्थ, फोटो शेअर करत म्हणाला, “बायको…”

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात येताच क्षणी आयेशाने मुन्नवरवर अनेक गंभीर आरोप केले होते. मुनव्वर दुसऱ्या मुलीबरोबर नात्यात होता, पण तरीही त्याने आपली फसवणूक केली असं यावेळी तिने म्हटलं होतं. मुनव्वरने वारंवार खोटं बोललं असून त्याने खूप मुलींची फसवणूक केली आहे, असा गंभीर आरोपही तिने केला होता. यांमुळे मुनव्वर हा घरात एकाकी पडला असून रडतानाचेही पाहायला मिळाले. तसेच त्याने अनेकदा आयेशाची माफीदेखील मागितली होती.  

Tags: ayesha khanbigg bossbigg boss 17 newsbigg boss newsBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsMunawar Faruquiआयेशा खानबिग बॉसबिग बॉस १७ बातमीबिग बॉस बातमीबॉलिवूड बातमीबॉलिवूड मनोरंजन बातमीमनोरंजन बातमीमुनव्वर फारुकी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Chahat Khanna Personal life
Entertainment

आजारी असतानाही शरीरसंबंध ठेवायचा आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जून 4, 2025 | 6:00 pm
Nivedita saraf talk about ashok saraf
Entertainment

“इतरांप्रमाणे दुसऱ्यांचे डायलॉग न कापता…”, पत्नी निवेदितांकडून अशोक सराफांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “दुसऱ्याला बरोबर घेऊन…”

जून 4, 2025 | 5:48 pm
Dipika Kakar Health
Entertainment

दीपिका कक्करची कॅन्सरवर मात, १४ तास सुरु होती शस्त्रक्रिया, नवऱ्याने दिली अपडेट, म्हणाला, “आता आयसीयूमध्ये…”

जून 4, 2025 | 4:24 pm
Jaya bachchan angry on paparazzi
Entertainment

Video : “निघा इथून, सगळेच घाणेरडे”, फोटोग्राफर्सवर अचानकच भडकल्या जया बच्चन, गाडीमध्ये बसूनही ओरडत राहिल्या अन्…

जून 4, 2025 | 3:29 pm
Next Post
Jui gadkari excited for her marriage from childhood actress talk about her future wedding

“मला लग्न करायची हौस होती पण...”, जुई गडकरी लग्नासाठी आहे उत्सुक, म्हणाली, “योग जुळून...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.