शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“अहिल्यादेवींचं डोकं फिरलं आहे”, ‘पारू’ मालिकेत आलेला ट्विस्ट पाहून प्रेक्षक भडकले, म्हणाले, “फालतू…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 8, 2025 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Paaru Marathi Serial

"अहिल्यादेवींचं डोकं फिरलं आहे", 'पारू' मालिकेत आलेला ट्विस्ट पाहून प्रेक्षक भडकले, म्हणाले, "फालतू..."

Paaru Marathi Serial : ‘पारू’ या मालिकेत सध्या खूप मोठं वळण आलेलं पाहायला मिळत आहे. मालिकेत अनुष्काच्या एन्ट्रीने किर्लोस्कर कुटुंबात ताटातूट झाली आहे. तर अनुष्काने अहिल्यादेवींच्या मनात घर करत पारूला त्यांच्या मनातून उतरवण्याचा डाव आखला आहे. दिशाची बहीण अनुष्का ही बहिणीच्या अपमानाचा बदला घ्यायला आली आहे. आणि या बदल्याची सुरुवात तिने पारुपासून करायचं ठरवलं आहे. दिशानेही सर्वात आधी पारूला बाजूला कर असा सल्ला तिची बहीण अनुष्काला दिलेला असतो. तर आदित्यच्या मनातही अनुष्काने घर केलं असून ती पारूच्या चुका वेळोवेळी त्याच्यासमोर आणताना दिसत आहे. जेणेकरुन आदित्यही पारूचा तिरस्कार करु शकेल.

मालिकेत अहिल्यादेवी सर्व कुटुंबासमोर असं घोषित करतात की, “आजपासून किर्लोस्कर कंपनीची नवी ब्रँड अँबेसेडर म्हणून अनुष्का काम बघेल”. हे ऐकून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो. तर पारूचाही चेहरा बघण्यासारखा होतो. त्याचवेळी अनुष्का आदित्यकडून सहानुभूती मिळवण्यासाठी त्याला फोन करुन पारू स्वतःच ब्रँड अँबेसेडर होण्यास तयार नसल्याचं सांगते. हे ऐकून आदित्यही घाबरतो. तो त्याचवेळी बोलायला म्हणून पुढे येतो मात्र अहिल्यादेवी हाताने इशारा करुन त्याला थांबवतात.

आणखी वाचा – दोन मुलींना मारहाण, एकीच्या तोंडावर गरम दूध फेकलं अन्…; गोविंदाच्या वागणूकीबाबत पत्नीचं मोठं भाष्य, सांगितली घटना

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

पारूचा हा निर्णय आदित्यला काही पटलेला नसतो. पारूच्या निर्णयानंतर आदित्य खूप त्रागा करतो. इतकंच नाही तर पारूचा पळकुटेपणा पाहून आदित्य रागाच्या भरात स्वतःला त्रास करुन घेतो, आणि त्याला दुखापत होते. त्यानंतर पारू काळजीपोटी त्याला मलमपट्टी करायला जाते. त्याचवेळी अहिल्यादेवीही आदित्यला मलमपट्टी करायला येतात मात्र पारूला आदित्यजवळ पाहून त्या दाराबाहेरच थांबतात. आदित्य व पारूला एकत्र पाहून अहिल्यादेवींच्या मनात पारूबद्दल गैरसमज निर्माण होतो.

आणखी वाचा – पहिल्या पत्नीपासून घटस्फोट, दुसऱ्या लग्नानंतर लगेचच डॉक्टरांकडे थेरपी सुरु, अशी का झाली फरहान अख्तरची अवस्था?

मालिकेत सुरु असणारी ही रंजक वळण प्रेक्षकांच्या पसंतीस पडत नाही आहेत. प्रोमो पाहून नेटकरी सोशल मीडियावर कमेंट करत मालिकेला, मालिकेच्या कथानकाला ट्रोल करत आहेत. हा प्रोमो पाहून नेटकरी असं म्हणत आहेत की, “अहिल्यादेवींचं डोकं फिरलं आहे, हिला बिलकुल माणसं ओळखता येत नाही”, “फालतू मालिका बंद करा आम्ही आता बघत पण नाही”, “मालिकेत सगळं फालतू दाखवत आहेत”, “एंगेजमेंट विसरा, तिचे लग्नही झालेले नाही आणि दिशाप्रमाणे ती किर्लोस्करच्या घरी राहते. एवढंच काय तर अहिल्यादेवीच्या नजरेतून काहीही लपवता येत नाही असं म्हणतात पण प्रत्येक वेळी पारू सगळं दुरुस्त करते”, “सिरीयल बंद करुन टाका”.

Tags: marathi serialpaaru marathi malika trollpaaru marathi serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Next Post
rahul raj singh on kamya punjabi

"काम्या खूपच दारु प्यायची, त्यामुळे प्रत्युषाही…", प्रत्युषा बॅनर्जीच्या एक्स बॉयफ्रेंडचे काम्या पंजाबीवर आरोप, म्हणालेला, "अडीच लाख…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.