टेलिव्हिजनवरील सुप्रसिद्ध मालिका ‘बालिकावधू’ आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेने अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. या मालिकेतील पहिली आनंदी म्हणजे प्रत्युषा बॅनर्जी. प्रत्युषाला या मालिकेमुळे मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती. मात्र नऊ वर्षांपूर्वी तिने तिचं आयुष्य संपवलं. २०१६ साली तिने आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येसाठी एक्स-बॉयफ्रेंड राहुल राज सिंहला जबाबदार ठवरले गेले होते. अहसतच आता नऊ वर्षांनंतर राहुलने मोठा खुलासा केला आहे. तसेच अभिनेत्री काम्या पंजाबीवर गंभीर आरोप केले आहेत. काम्यावर नक्की काय आरोप केले आहेत? ते आपण आता जाणून घेऊया. (rahul raj singh on kamya punjabi)
राहुलणए सुभोजित घोषच्या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यामध्ये त्याने प्रत्युषाच्या आत्महत्येबद्दल भाष्य केले आहे. प्रत्युषाच्या आत्महत्येसाठी त्याला जबाबदार का ठरवले? याबद्दल त्याने सांगितले आहे. राहूलने काम्याचे नाव घेतले होते. प्रत्युषाच्या हत्येची गोष्ट काम्याने सुरु केली त्यानंतर विकास गुप्ता व राखी सावंत यांनी ही गोष्ट पुढे वाढवल्याचे तो म्हणाला.
आणखी वाचा – Bigg Boss 18 च्या ग्रँड फिनाले पूर्वीच विजेत्याचे नाव समोर, कोण ट्रॉफी घरी घेऊन जाणार?
राहुल म्हणाला की, “काम्या व विकास यांनी या प्रकरणात उडी घेतली. ते म्हणाले की राहुलने प्रत्युषाची हत्या केली. हे सगळं मी मुलाखतीमध्ये ऐकलं होतं. ते म्हणाले की प्रत्युषाला कोणतीही आर्थिक समस्या नव्हती. तिच्याकडे कामदेखील होतं. विकासने प्रत्युषाला काम दिले नाही पण अशी वक्तव्य केली”.
त्यानंतर काम्यावर निशाणा साधत म्हणाला की, “काम्याने प्रत्युषाकडून अडीच लाख रुपये उधार घेतले होते. ते पैसे तिने कधीही परत नाही दिले. एका पार्टीमध्ये प्रत्युषाने काम्याशी भेट घडवून दिली होते. त्यावेळी काम्या नशेत होती. प्रत्युषाने काम्याकडे उधार दिलेले पैसे मागितले. पण काम्याने कोणतंही काम नसल्याचे सांगितले पण परत देणार असल्याचे वचन दिले”.
तसेच नंतर तो म्हणाला की, “काम्या खूप दारु प्यायची. प्रत्युषाने दारु पिणं बंद करावं असं मला नेहमी वाटायचं. तिचे मित्र मैत्रिणी खूप दारु प्यायचे. मी सगळं तिच्या चांगल्यासाठी सांगत आहे ते प्रत्युषाला माहीत होतं. त्यामुळे तिने पार्टीला जाणं बंद केलं. त्यामुळे मी सगळ्यांसाठी वाईट झालो. त्यांना वाटलं की मी प्रत्युषाला सगळ्यांपासून लांब करत आहे”. दरम्यान राहुलच्या वक्तव्यावर काम्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.