बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पहिल्या पत्नीपासून घटस्फोट, दुसऱ्या लग्नानंतर लगेचच डॉक्टरांकडे थेरपी सुरु, अशी का झाली फरहान अख्तरची अवस्था?

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 8, 2025 | 12:55 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
farhan akhatar and shibani dandekar married life

दुसऱ्या लग्नानंतर फरहान अख्तरची झाली आहे अशी अवस्था

बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता फरहान अख्तर सध्या खूप चर्चेत असलेला बघायला मिळतो.  २००१ साली प्रदर्शित झालेल्या आणि आजही लोकप्रिय असलेल्या ‘दिल चाहता है’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्याने केले आहे. तसेच ‘डॉन’ या चित्रपटाचेदेखील त्याने दिग्दर्शन केले आहे. तसेच त्याचे ‘जिंदगी मिलेगी ना दोबारा’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘रॉक ऑन’, ‘तूफान’, ‘दिल धडकने दो’ या चित्रपटांमध्येही काम करताना दिसला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो. आज फरहानचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्याबद्दलच्या काही रंजक गोष्टी जाणून घेऊया. (farhan akhatar and shibani dandekar married life)

फरहान २००० साली अधुना भबानीबरोबर लग्नबंधनात अडकला. मात्र त्यांच्यामध्ये भेदभाव झाल्याने दोघही २०१७ साली वेगळे झाले. त्यांना दोन मुलीदेखील आहेत. त्यानंतर फरहान व शिबानी दांडेकर यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०२२ मध्ये दोघंही लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर दोघांचेही अनेक फोटोदेखील समोर आले होते. अशातच फरहान व शिबानी रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याणए त्याच्या संसाराबद्दल भाष्य केले आहे.

आणखी वाचा – लग्नानंतरच्या पहिल्या मकरसंक्रांतीची तयारी करत आहे पूजा सावंत, खास दागिन्यांनी वेधलं लक्ष, व्हिडीओ समोर

View this post on Instagram

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

फरहान व शिबानी साखरपुड्याच्या काही दिवसांतच थेरपी घेण्यास सुरुवात केली होती. लग्नानंतरही दोन दिवसांतच ते थेरपी घेण्यासाठी पोहोचले होते. याबद्दल बोलताना शिबानीने सांगितले की, “आम्ही साखरपुड्याच्या ६ महीने आधीच थेरपी घेण्यास सुरुवात केली होती. हे एका जिमला जाण्यासारखे आहे. आपल्याला यावर काम करत राहावे लागते. आम्ही अनेक सेशन घेतले आहेत. अनेकदा तर आम्ही आत जायचो आणि आमच्याकडे बोलायला काहीही नव्हतं आणि अनेकदा तर बोलायला खूप काही असायचं”.

आणखी वाचा – …तर दारुसह आमिर खान इतर व्यसनही सोडणार, लेकाचा पहिला चित्रपट सुपरहिट व्हावा म्हणून अभिनेत्याचा अजब नवस

पुढे ती म्हणाली की, “आमच्यावर अशीही वेळ यायची की आम्ही घरी भांडायचो पण आम्हाला थेरपिस्टला भेटायचं आहे हे माहीत होतं. आम्ही लग्नाच्या दोन दिवसानंतर थेरपी घेण्यासाठी गेलो होतो. सोमवारी आमचं लग्न झालं आणि आम्ही बुधवारी थेरपिस्टकडे गेलो होतो. त्यावेळी थेरपिस्टदेखील आश्चर्यचकित झाले होते. तुम्ही इथे काय करताय? असंही त्यांनी आम्हाला विचारले. आता २४ तासांपूर्वी लग्न केलं होतं”. दरम्यान सध्या दोघांचाही सुखी संसार सुरु आहे.      

Tags: farhan akhtarmarried lifeshibani dandekar
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
tula shikvin changlach dhada serial update bhuvaneshwari plan to brake adhipati and akshara marriage new promo viral

अधिपती-अक्षरामध्ये पुन्हा एकदा दुरावा आणण्यासाठी भुवनेश्वरी यशस्वी, दोघांचा संसार मोडण्यासाठी प्रयत्न, मोठा ट्विस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.