Govinda Hit Two Girls In College : गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांचे लग्न १९८७ मध्ये झाले. त्यावेळी गोविंदाने नुकतेच ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते आणि त्यानंतर लगेचच दोघांचीही कुटुंबातील एका सदस्याने ओळख करुन दिली. तेव्हा गोविंदा चित्रपटातही आला नव्हता. एका जुन्या मुलाखतीत सुनीताने सांगितले होते की, जेव्हा तिच्या बहिणीच्या पतीने (गोविंदाचा नातेवाईक) तिला गोविंदाबद्दल सांगितले तेव्हा तिला वाटले की, तो महिलांशी बोलतही नाही. वास्तविक, गोविंदा कॉलेजमध्ये दोन मुलींबरोबर हिंसक झाल्याचं त्याला सांगण्यात आलं होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गोविंदाबद्दल हे ऐकून सुनीताला खूप आनंद झाला आणि तिने त्याला भेटण्यात रस दाखवला.
फारुख शेखच्या शो ‘जीना इसी का नाम है’ च्या एका एपिसोडमध्ये सुनीताने सांगितले की, तिने पहिल्यांदा गोविंदाबद्दल त्याच्या मेव्हण्याकडून ऐकले. सुनीताने त्याच्याबद्दल विचारले असता गोविदा मुलींशी बोलत नाही असे तिला सांगण्यात आले. सुनीता म्हणाली, “माझ्या मेव्हण्याने सांगितले की गोविंदाने मुलींना मारहाण केली आहे. तो म्हणाला त्याच्याशी बोलू नकोस. गोविंदाने आपल्या कॉलेजमधील दोन मुलींना मारलं होतं, असेही तो म्हणाला होता. त्यातील एकावर त्याने छत्री मारली आणि दुसऱ्या मुलीच्या तोंडावर गरम दूध फेकले. तो मुलींशी अजिबात बोलत नाही”.
आणखी वाचा – वरुण धवन व नताशा दलाल यांनी जुहू येथे खरेदी केले आलीशान घर, घराची किंमत ऐकून व्हाल थक्क
सुनीता पुढे म्हणाली, “मला प्रश्न पडू लागला की हा मुलगा कोण आहे जो मुलींशी बोलत नाही. मी माझ्या मेव्हण्याला सांगितले की त्याला फोन कर मी त्याच्याशी बोलेन. तेव्हा मी त्याला भेटले. या भेटीनंतर काही दिवसांत दोघांनी लग्न केले. यावेळी सुनीता अवघ्या १८ वर्षांच्या होत्या. अलीकडेच ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, त्याच्या वडिलांनी त्याच्या लग्नाला मान्यता न दिल्याने त्यांनी लग्नाला हजेरी लावली नाही.
गोविंदा व सुनीता यांची भेट झाली तेव्हा दोघांची आर्थिक पार्श्वभूमी खूप वेगळी होती. वास्तविक सुनीता वांद्रे येथील एका श्रीमंत कुटुंबातील होती, तर गोविंदा तेव्हा विरारचा स्ट्रगलिंग आर्टिस्ट होता. दोघेही एकमेकांमध्ये गुपचूप गुंतल्यामुळे चित्रपटसृष्टीतील कोणालाच त्यांच्या प्रेमकथेबद्दल माहित झाले नाही.१९९० मध्ये ‘स्टारडस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने सांगितले की, त्याने सुनीताबरोबर ब्रेकअप करण्याचा विचार केला होता कारण तो नीलम कोठारीच्या प्रेमात पडला होता. तो म्हणाला होता, “मी तिची (नीलम) स्तुती करणे थांबवू शकलो नाही. मी सुनीताला स्वतःला बदलून नीलमसारखं व्हायला सांगेन. तिच्याकडून शिकायला सांगेन. सुनीता चिडायची आणि ती मला म्हणायची – तू माझ्यावर प्रेम करतोस आणि मी आहे तशीच राहणार आहे”.
आणखी वाचा – …तर दारुसह आमिर खान इतर व्यसनही सोडणार, लेकाचा पहिला चित्रपट सुपरहिट व्हावा म्हणून अभिनेत्याचा अजब नवस
तो पुढे म्हणाला, “पण मी खूप गोंधळलो होतो”. त्याच मुलाखतीत गोविंदाने कबूल केले की, “सुनीताबरोबर इतके गंभीर संबंध ठेवण्याचा त्याचा कधीच हेतू नव्हता”. तो म्हणाला, “मी एक मुलगी शोधत होतो जिच्याबरोबर मी हँग आउट करु शकेन”. गोविंदाने सांगितले की, “त्याला पडद्यावर एक रोमँटिक सीन करायचा होता पण खऱ्या आयुष्यात तो याबद्दल खूप अस्वस्थ होता, त्यामुळे त्याच्या भावाने त्याला प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी कोणाबरोबर तरी बाहेर जाण्याचा सल्ला दिला”.