बॉलिवूड सिनेसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत ज्यांच्या सिनेसृष्टीतील जोड्या कायमच चर्चेत राहिल्या. या जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे सलमान खान व कतरीना कैफ. एक काळ असा होता जेव्हा सलमान खान व कतरिना कैफ एकमेकांना डेट करत होते, पण ‘एक था टायगर’ चित्रपट सुरु होण्यापूर्वीच त्यांचे ब्रेकअप झाले. असे असूनही दोघांनी एकत्र काम केले. मात्र, त्यावेळी सलमान व कतरिना एकत्र काम करणं पसंत करत नव्हते. ‘एक था टायगर’चे दिग्दर्शक कबीर खान यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. (Salman Khan And Katrina Kaif Affair Incident)
कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा लवकरच मॅशेबल इंडियावर पॉडकास्टसह येत आहेत, ज्यामध्ये त्यांनी कबीर खान, फराह खान, इम्तियाज अली, हंसल मेहता व राज आणि डीके यांना बोलावले आहे. अलीकडेच त्याचा प्रोमो रिलीज झाला, ज्यामध्ये कबीर खान त्याच्या ‘एक था टायगर’ चित्रपट आणि सलमान व कतरिनाबद्दल बोलताना दिसला.
कबीर खानने टायगरच्या भूमिकेसाठी सलमान खानला कसे कास्ट केले याबाबत त्याने भाष्य केलं. मात्र, झोयाच्या भूमिकेसाठी तो कतरिना कैफचा विचार करत असताना त्याने सलमानशी संपर्क साधला. कबीरने सांगितले की, “हा तो टप्पा होता जिथे त्यांचे ब्रेकअप झाले होते आणि तो तिच्याबरोबर काम करायला इच्छुक नव्हता”.
सलमान व कतरिनाची प्रेमकहाणी २००५ मध्ये सुरु झाली होती. दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले. हळूहळू ते एकमेकांवर प्रेम करु लागले आणि त्यानंतर बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये प्रेमाच्या अफवा पसरल्या. २०१० मध्ये कतरिना व सलमानचे ब्रेकअप झाले. पुढे कतरिना रणबीर कपूरच्या प्रेमात पडली आणि सलमान अविवाहित राहिला. त्यावेळी सलमान व कतरिना यांच्यात दुरावा आला असला तरी आज दोघेही चांगले मित्र आहेत आणि एकत्र काम करत आहेत.