Khushboo Tawde Baby Name Ceremony : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय बहिणींची जोडी म्हणजे अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेत्री तितीक्षा तावडे. दोघींनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे दोघी नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच खुशबूने लेक झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांशी शेअर केली. खुशबू व संग्राम साळवीला कन्यारत्न प्राप्त झालं. तर इकडे मावशी झाल्याचं कळताच तितिक्षाचा आनंदही गगनात मावेनासा झाला. खुशबूने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पती संग्राम साळवी, मुलगा राघव आणि आपल्या गोंडस लेकीबरोबरचा खास फोटो शेअर केलेला पाहायला मिळाला. खुशबूने आपल्या लाडक्या लेकीचे नाव ‘राधी’ असं ठेवलं आहे.
यानंतर खुशबूची बहीण तितीक्षाने भाचीच्या जन्मदिवसाचा खास व्हिडीओही शेअर केला. यावेळी ती भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर आता तितीक्षा तावडेने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन खुशबू तावडे आणि संग्राम साळवी यांच्या लेकीच्या बारशाचा सुंदर असा व्हिडीओ शेअर केला आहे. तितीक्षा मावशी झाली हे तिला कळालं त्या वेळेला तिला अश्रू देखील अनावर झालेले पाहायला मिळाले. आता मावशी झाल्यानंतर भाचीच्या बारशाचा सुंदर असा व्हिडीओ तिने शेअर केलेला पाहायला मिळतोय. अगदी घरच्या घरीच कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा नामकरण सोहळा पार पडलेला पाहायला मिळतोय.
आणखी वाचा – आईवर जीवापाड प्रेम करतो राकेश बापट, तिच्याच सांगण्यावरुन करत आहे मराठी मालिका, म्हणाला, “आईची माया…”
खुशबू व संग्राम यावेळी खूपच खुश असलेले दिसले. बाळाला पाळण्यात घालायला मावशी खूपच उत्सुक असल्याचेही पाहायला मिळालं. ‘राघी’ असं खुशबू व संग्रामच्या लेकीचं नाव आहे. घरच्या घरीच फुलांची सजावट करत अगदी थोडक्यात आणि साधेपणाने केलेला हा नामकरण सोहळा साऱ्यांचाच लक्ष वेधून घेतोय. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलेला पाहायला मिळतोय. तावडे कुटुंबाचे हे साधेपण अधिक लक्षवेधी ठरतेय.
आता तितीक्षाने मावशी झाल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मावशी ही आई असल्याची भावना तिने यावेळी व्यक्त केली. इट्स मज्जाशी साधलेल्या संवादात तितीक्षा असं म्हणाली की, “असं म्हणतात की मावशी ही आईच असते आणि खरंही आहे. कारण ती भावना आपण वेगळी करू शकत नाही की आईला असं वाटते आणि मावशीला असं वाटतं. मावशीलाही तेवढच प्रेम आणि तेवढीच ओढ असते. दुसरी गोष्ट म्हणजे मावशी कुठे तरी जास्त लाडावून ठेवते. म्हणजे भाच्याने काही मागितलं आणि ते मावशीने दिलं नाही असं कधी होणार नाही”.