राजाराणी ची गं जोडी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असून या मालिकेतील अभिनेत्री शिवानी सोनार हिने तिच्या अभिनयाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली. शिवानी तिच्या सोशल मीडियावर सुद्धा तितकीच सक्रिय असून ती इंस्टाग्रामवर नवनवीन फोटोज आणि व्हिडियोज शेअर करत असते. (adorable Shivani Sonar)
अलीकडेच शिवानी सोनार हिने तिच्या इंस्टाग्रामवर साडींवरचे काही फोटोज आणि एक व्हिडीओ शेअर केला असून तिचे हे फोटोज सध्या चर्चेत आहेत. (adorable Shivani Sonar)
शिवानीने पोस्ट केलेल्या फोटोज मध्ये तिने नेव्हीब्ल्यू रंगाची साडी नेसली आहे. त्यावर काळ्या कलरचा ब्लाउज परिधान केला आहे. हे फोटोज तिने समुद्र किनाऱ्यावर काढले आहेत. (adorable Shivani Sonar)
या लूकमध्ये शिवानीने सिल्वर रंगाचे कानातले वेअर केले आहेत. शिवनीचा हा लुक जरी सिम्पल असला तरी शिवानी यात मनमोहक दिसत आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी “नजर घायाळ with natural beauty” तसेच “बाजीराव ची मस्तानी कशी असेल तर ती अशी” अशा छान कमेंट्स देखील केल्या आहेत.
हे देखील वाचा: प्रिया च्या फोटोवरील नवऱ्याच्या कमेंटने वेधलं लक्ष
शिवानीने “डॉ बाबासाहेब आंबेडकर महामानवांची गौरवगाथा” या मालिकेतून मराठी मालिकाविश्वामध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर ती “राजा राणी ची गं जोडी” या मालिकेत संजीवनी ढालेपाटील नावाच्या मुख्य भूमिकेत दिसली. शिवानी पुण्यामध्ये शिकली असून ती मुंबईमध्ये तीच करियर घडवण्यासाठी आली होती.
शिवानीची मेहनत आणि तिच्या नशिबाने तिला साथ दिल्यामुळे शिवानी तिची जागा मराठी सिनेविश्वात बनवण्यात यशस्वी ठरली. शिवानी अद्याप कोणत्याही मालिकेत काम करत नसून ती लवकरच कोणत्या तरी मालिकेत प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत दिसेल अशी आस लावून तिचे चाहते बसले आहेत. (adorable Shivani Sonar)
हे देखील वाचा: विदिशाने नेसली रेशमाची ‘नजर’ लागलेली साडी…
शिवानी अलीकडे सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह झाली असून, शिवानी तिच्या सोशल मीडियावर तिच्या फोटोशूटचे फोटोज पोस्ट करत असते. याचबरोबर काही दिवसांपूर्वी पार पडलेला कलर्स मराठी अवार्ड या पुरस्कार सोहळ्याचे तिने सूत्र संचालन देखील केले होते.