“रंग माझा वेगळा” ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. ही मालिका गेली तीन वर्षे स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरु आहे. जशी मालिका दिवसेंदिवस पुढे जात गेली तसा मालिकेचा प्लॉट बदलत गेला. मालिकेची सुरुवात दीपा आणि कार्तिकच्या प्रेमाच्या विरोधापासून झाली. आणि आता मालिकेत कार्तिक चौदा वर्षांनी जेल मधून परत आल्याचं दाखवलं आहे. आणि तो पर्यंत दीपा आणि कार्तिकच्या मुली देखील मोठ्या झाल्याचं दाखवलं आहे. (Reshma Shinde And Vidisha Mhaskar)
रंग माझा वेगळा या मालिकेचे १०००भाग पूर्ण झाले आहेत. या संबधितचा व्हिडीओ “इट्स मज्जा” च्या ऑफिशल इन्स्टा पेजवर शेअर केला होता. त्या व्हिडियोवर या मालिकेतील खलनायिका म्हणजेच विदिशा म्हसकर हिच्या साडीवर या मालिकेतील नायिका रेश्मा शिंदे हिने कमेंट केली आहे.
हे देखील वाचा: जेष्ठ अभिनेत्री उत्तरा बावकर काळाच्या पडद्याआड
या व्हिडियोवर रेश्माने कमेंट करत विदीशाला विचारलंय हीच का ग ती साडी? तिच्या या कमेंटला विदिशाने रिप्लाय करत “तुझी नजर लागलेली तीच ती”, असे मिश्किल अंदाजात म्हंटले आहे. विदिशाची म्हणजेच अयशाची या मालिकेत पुन्हा एंट्री झाली आहे. आयशाच्या येण्याने आता मालिकेत दीपा आणि कार्तिकच्या आयुष्यात काय बदल घडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. (Reshma Shinde And Vidisha Mhaskar)
हे देखील वाचा: म्हणून अशोक सराफ नानांना म्हणाले..’काय नान्या श्रीमंत झालास का?’
सध्या मालिकेत सुरु असलेल्या कथानकानुसार दीपिका कार्तिकीला उशिरा घरी आल्यामुळे ओरडत असते त्यावर कार्तिकी तिला म्हणते तू दीपा इनामदार बनण्याचा प्रयत्न करू नकोस. आयशा घरामध्ये झुरळ घेऊन फिरत असते,नंतर ती अदृश्य कार्तिकला सूप भरवते, हे सगळं बघून आर्यन ला खूप त्रास होत असतो. नंतर आर्यनची आजी आर्यनला सांगते, कार्तिक जेल मध्ये गेल्यानंतर तुझी आई आणि मावशी अयिशाचं अक्सीडन झालं होत आणि त्यात आर्यांची आई देवाघरी गेली आणि आईशाची अशी अवस्था झाली. त्यावर आर्यन त्याच्या आज्जीला म्हणतो मी याचा बदला घेऊनच राहील. तर एकीकडे कार्तिक दीपकडून बदल घ्येण्याच्या भावनेने जेल मधून परत आला असून त्याने या सगळ्याला आता सुरुवात केली आहे.