आदिनाथ कोठारे आणि महेश कोठारे ही बापलेकाची जोडी कायमच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असते. या दोघांमधील बॉण्डही घट्ट असून ही जोडी नेहमीच रसिकांच्या पसंतीस पडते. अशातच पाडव्यानिमित्त आदिनाथ आणि महेश कोठारे यांनी पोस्ट केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. आदिनाथने हा व्हिडीओ पोस्ट करत या व्हिडिओमध्ये गुढी पाडवा त्यांच्यासाठी का खास आहे याबद्दल सांगताना दिसतोय. (adinath kothare troll)
पहा काय म्हणाले नेटकरी (adinath kothare troll)
व्हिडिओमध्ये आदिनाथ महेश कोठारे यांच्यासोबत किचनमध्ये दिसतोय. आणि आज काय स्पेशल मेन्यू आहे ते दाखवत आहे. तर महेश कोठारे हा मेन्यू ओपन करून साखरभात आणि त्यासोबत मटण असा स्पेशल मेन्यू असल्याचं इंग्रजीत सांगत आहेत. आदिनाथच्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी कमेंट करत ट्रोल करताच आदिनाथने त्याच्या या पोस्टचे कमेंट सेक्शन बंद केले. त्यानंतर हाच व्हिडीओ महेश कोठारे यांनी देखील त्याच्या इंस्टाग्ग्राम अकाउंटवरून शेअर केला. त्याच्या या व्हिडिओवर संताप व्यक्त करत नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले. यांत एका युजरने लिहिले, पाडव्याला मटण? तर दुसऱ्या युजरने म्हटलंय, मराठी येत नाही का? असे म्हणत त्यांना कमेंट केलं आहे.

====
हे देखील वाचा – आनंदी करणार बिझनेस, राघव करेल का तिचा पुन्हा स्वीकार?
====
महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून आता गुढीपाडव्याला गोडाधोडा ऐवजी मटणाचा बेत केल्याने नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच ट्रोल केलं आहे. शिवाय हा व्हिडीओ करत असताना महेश कोठारे आणि आदिनाथ यांच्यातला संवाद हा बऱ्यापैकी इंग्लिशमध्ये होता आणि मराठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला मराठीत न बोलता इंग्लिशमध्ये संभाषण केल्याने नेटकऱ्यानी संताप व्यक्त केलाय. (adinath kothare troll)
