छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘नवा गडी नवं राज्य’. या मालिकेतील सर्वच पात्रांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. मालिका सुरु झाल्यापासून या मालिकेला आणि मालिकेतील पात्रांना अक्षरशः रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले आहे. या मालिकेचे कथानक हे कौटुंबिक असलं तरी रोजच्या जीवनापेक्षा वेगळे कथानक यांत आहे. नात्यामधली भावनिक गुंफण कालांतराने कसे पदर उलगडते याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘नवा गडी नवं राज्य’.(nava gadi nav rajya)
पहा आनंदीचा नवा बिझनेस कोणता आहे (nava gadi nav rajya)
नवा गडी नवं राज्य मालिकेत सध्या एक वेगळंच वळण आलेलं पाहायला मिळत आहे. मालिकेत राघव आणि आनंदीच्या नात्यात दुरावा आलेला दिसतोय. सततचा अबोला धरून राघवने आनंदीसाठी त्याच्या मनाचे दरवाजे बंद केले आहेत. त्यामुळे आनंदी पूर्णपणे खचलेली पाहायला मिळाली. असे असताना आनंदीच्या मनाचा विचार करून तिला तिच्या सासूने, नणंदेने, रमाच्या आई बाबांनी बऱ्यापैकी धीर दिला. हे सगळं सुरु असताना मात्र आनंदीच्या आयुष्यात नवी इनिंग आलेली पाहायला मिळणार आहे.
चिंगी आनंदीसाठी ऑर्डर घेऊन आलेली पाहायला मिळाली. exclusive गुढी जी आनंदीने चिंगीच्या प्रोजेक्टसाठी बनवली होती. ती पाहून चिंगीच्या मित्राचा मामाने चिंगीच्या मदतीने आनंदीला तब्बल ३० हजार रुपयांची ऑर्डर दिली. आनंदीचा आधी व्यवसाय करायला नकारच होता मात्र रमा आणि चिंगीच्या म्हणण्यानुसार आनंदीने ही ऑर्डर स्वीकारली आणि आनंदी कामाला लागली. (nava gadi nav rajya)
====
हे देखील वाचा – प्राजक्ता माळीचे छोट्या पडद्यावर पुनरागमन!
====
आता आनंदीने तिच्या व्यवसायाला सुरुवात केलेली पाहायला मिळतेय. गावातून मुंबईत येऊन बदललेल्या जीवनाला आकार देत आनंदीने सगळ्यांचा आनंदाने स्वीकार केला. आता शेवटी ती तिच्या मार्गाला लागली आहे. पैसे कमवण्याची उमेद आनंदीमध्ये निर्माण झालेली मालिकेच्या येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. आता आनंदी आणि राघव यांच्यात वादविवाद सुरु असताना आनंदी स्वतःच्या पायावर उभी राहताना पाहायला मिळणार आहे. यातून आनंदी आता एक उत्तम बिझनेस वुमन बनणार का? स्वतःच्या पायावर उभी राहिल्यावर आनंदी आणि राघव यांच्यातील दुरावा आणखी वाढेल की मिटेल हे पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल. आनंदीच्या या नव्या व्यवसायाबद्दल तुम्हाला काय वाटत आम्हाला कमेंट करून नक्की.